Gen Beta म्हणजे आहे तरी काय?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
येत्या वर्षात म्हणजेच २०२५ पासून २०३९ पर्यंतच्या काळात जन्माला येणाऱ्या पिढीला जनरेशन बीटा अर्थात Gen Beta असे म्हटले जाणार आहे. या जनरेशन बीटा चे स्वागत करण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. त्यांच्याबद्दल अद्याप काही फारसं सांगता येत नसलं तरी ही पिढी जनरेशन अल्फा प्रमाणेच तंत्रज्ञान जाणकार आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक असतील आणि टिकाऊपणाला प्राधान्य देणं हा त्यांचा गुण असू शकतो, असं सांगितलं जातं.
सध्या सगळीकडे नवीन वर्षाची चाहूल लागते आहे. नवीन वर्षाचे स्वागत, त्याचे नियोजन, संकल्प तसेच सरत्या वर्षाला निरोप असे सगळे वातावरण आपल्या आजूबाजूला दिसत आहे. अशातच एक चर्चा सुरू झाली, ती म्हणजे Gen Beta ची. आता जनरेशन बीटा नेमकं आहे काय ते समजून घेऊया. आपल्याकडे प्रत्येक पिढीला विशिष्ट नाव देण्यात आले आहे. त्याचा अर्थही सोप्या शब्दात मांडता येईल. आता पिढ्यांचं हे वर्गीकरण कसं केलं जातं तर त्या – त्या कालावधीत जन्मलेल्या लोकांचे सामूहिक अनुभव, मूल्य, सांस्कृतिक प्रभावांवर ते आधारित असतं. अशा प्रकारे पिढ्यांच्या वर्गीकरणाची सुरुवात विसाव्या शतकापासून झाली आहे.

नवीन वर्षात म्हणजेच २०२५ पासून २०३९ पर्यंतच्या काळात जन्माला येणाऱ्या पिढीला जनरेशन बीटा अर्थात Gen Beta असे म्हटले जाणार आहे. त्यांचे पालक जनरेनश वाय (Y) आणि जनरेशन झेड (Z) पिढीतील असणार आहेत. तसेच येणाऱ्या पिढीतील अनेक जण २२ वं शतक सुद्धा पाहणार आहेत. २०३५ पर्यंत ही पिढी जागतिक लोकसंख्येच्या १६ टक्के भाग असेल.
काय आहेत पिढीनुसार नावं?
१९०१ ते १९२७ – द ग्रेटेस्ट जनरेशन
१९२८ ते १९४५ – द सायलेंट जनरेशन
१९४६ ते १९६४ – बेबी बूम जनरेशन
१९६५ ते १९८० – जनरेशन x
१९८१ ते १९९६ – जनरेशन Y
१९९७ ते २०१० – जनरेशन z
२०१० ते २०२४ – जनरेशन अल्फा
२०२५ ते २०३९ – जनरेशन बीटा