फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
महाराष्ट्र

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत २३ उमेदवार

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत २३ उमेदवार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाने राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये काँग्रेस पक्षाने आपल्या २३ उमेदवांराची घोषणा केली आहे.

काँग्रसने आपल्या पहिल्या यादीमध्ये ४८ जागांची घोषणा केलेली होती. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीमध्ये विदर्भातील बहुतांश जागांचा समावेश आहे. यामध्ये वर्धा, सावनेर, नागूपर दक्षिण, कामठी, भंडारा, अर्जुनी मोरगाव, उमरखेड आणि आमगाव या विदर्भातील जाागा आहे. अजुनही सर्व जागांच्या घोषणा झालेल्या नसून काही जागा शिल्लक आहेत.

ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये विदर्भातील जागांवरून वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी मध्यस्थी करत जागांचा तिढा सोडावला होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याविरोधात कामठी मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून सुरेश भोयर यांना रिंगणात उतरवलं आहे. या यादीमध्ये सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अद्यापही मुंबईमधील काही जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये चर्चा होणार असल्याचं समजत आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेणार आहेत.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"