खरेदी केलेला फ्लॅट बिल्डरने परस्पर दुसऱ्याला विकून केली फसवणुक!

पिंपरी: मॅजेस्टिक बिल्डर अँड डेव्हलपर्स यांच्याकडून 2018 मध्ये एग्रीमेंट टू सेल फ्लॅट खरेदी केला. परंतु हा फ्लॅट आज पर्यंत ताब्यात न देता तोच फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला विकून 48 लाख 5000 रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही घटना एक मार्च 2017 ते आज पर्यंत घडली असून सर्वे नंबर 2 16 / 1 मॅजेस्टिक प्राइड बिल्डींग, फ्लॅट नंबर 301, दिघी रोड, भोसरी येथे घडली.

मंगेश गुंडू माडखोलकर (वय 51, स.नं.216/2 ,श्री स्वामी समर्थ नगर ,जी बिल्डिंग, फ्लॅट नंबर 18, भोसरी) यांनी फिर्यादी दिली आहे. मॅजेस्टिक बिल्डर अँड डेव्हलपर्स चे पार्टनर रितेश वासवानी (वय 45, रा. मोनिका आपारमेंट ,फ्लॅट क्रमांक 101, पिंपरी ),राजकुमार वासवानी (वय 54, रा. पिंपरी), जगदीश टीकामदार (वय 47, रा. पिंपरी )अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मॅजेस्टिक बिल्डर अँड डेव्हलपर्स कडून फिर्यादी यांनी सर्वे नंबर 216/ 1 मॅजेस्टिक प्राइड बिल्डींग, फ्लॅट नंबर 301, दिघी रोड, भोसरी हा फ्लॅट सन 2018 मध्ये एग्रीमेंट टू सेल खरेदी केला. परंतु वरील आरोपींनी या फ्लॅटचा ताबा फिर्यादीस आज पर्यंत दिला नाही. फिर्यादीच्या नावावर एग्रीमेंट असलेला फ्लॅट आरोपींनी गौरव वामन क्षिरसागर या व्यक्तीस 27 डिसेंबर 2022 मध्ये पंधरा लाख साठ हजार रुपये किमतीला विक्री केला .मॅजेस्टिक बिल्डर अँड डेव्हलपर्सच्या भागीदारांनी फिर्यादी कडून 32 लाख 45000 घेऊन अद्याप पर्यंत फ्लॅटचा ताबा न देता तो फ्लॅट अन्य व्यक्तीस विकून 48 लाख 5000 रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे म्हटले आहे .भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

