फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पुणे

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापनदिन समारंभाचे आयोजन!

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापनदिन समारंभाचे आयोजन!

पुणे : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापन दिन समारंभ गुरुवार १ मे २०२५ रोजी सकाळी ८ वा. पोलीस संचलन मैदान, शिवाजीनगर येथे होणार असून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार आहे.

यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना, पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल आदींचे संयुक्त संचलन होणार असून श्री. पवार या प्रसंगी मानवंदना स्वीकारणार आहेत. शासकीय ध्वजारोहण समारंभास केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागाचे प्रमुख, प्रादेशिक प्रमुख, कार्यालयीन प्रमुख, पुणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सकाळी ७.४५ वा. वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले आहे.

viara ad
viara ad
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"