औद्योगिक क्रीडा संघटनेची ६२ वी टेबल टेनिस स्पर्धा संपन्न!

प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड आयोजित स्पर्धा
पुणे ; औद्योगिक क्रीडा संघटनेची ६२ वी टेबल टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी ,महिला एकेरी व प्रौढ गट एकेरी ४९ वर्षावरील अशा ४ गटात झाल्या.सदर स्पर्धा प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड पुणेने आयोजित केली.दिनांक २८ नोव्हेंबर शुक्रवार रोजी म्हातोबा टेबल टेनिस हॉल कोथरूड पुणे येथे संपन्न झाली

टाटा मोटर्स,एसकेएफ,बजाज ऑटो आकुर्डी,मिंडा कॉर्पोरेशन,टेट्रापॅक,सँडविक एशिया,ॲटलास कॉपको,फ्लीटगार्ड फिल्टर्स,फॉरविया फोरएशिया,प्राज इंडस्ट्रीज,लुपिन,डीआरडीओ,अमिनेशन फॅक्टरी,५१२ आर्मी बेस वर्कशॉप,इन्फोसिस,टीकेआयएल वगैरे १९ कंपन्यांच्या ८६ पुरुष व महिला खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला.
या स्पर्धेचे उद्घाटन प्राज इंडस्ट्रीचे व्हॉइस प्रेसिडेंट वैभव तिवारी यांच्या हस्ते झाले.यावेळी ते म्हणाले की आपले क्रीडा कौशल्य वाढीस लागावे यासाठी स्पर्धा गरजेची असते.या स्पर्धेत विविध कंपन्यांच्या खेळाडूचा प्रतिसाद पाहून आनंद वाटला.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण गणेश इनामदार (प्रसिद्ध मोटरसायकलिस्ट व पर्यटक) व प्राज इंडस्ट्रीज स्पोर्ट्स कमिटीचे राहुल कापसे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना गणेश इनामदार म्हणाले की खेळ खेळल्याने शरीराला व्यायामाची सवय लागते तसेच हारजीत पत्करण्याची ही सवय होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप वाघ,प्रास्ताविक नरेंद्र कदम व आभार प्रदर्शन विजय हिंगे यांनी केले.औद्योगिक क्रीडा संघटनेचे सचिव वसंत ठोंबरे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.स्पर्धेसाठी हरी देशपांडे,राहुल कापसे,अविनाश जोशी, वासुदेव अग्निहोत्री व शिवानी निषाद यांचे मोलाचे साह्य लाभले.
या स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे
अंतिम फेरी : रेणुका कोल्हे(इन्फोसिस) विरुद्ध कल्पिता कुलकर्णी(एचईएमआरएल) यात झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये रेणुका कोल्हेने(इन्फोसिस) विजय मिळवून एकेरी महिला गटाचे विजेतेपद पटकावले व कल्पिता कुलकर्णी (एचईएमआरएल) यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले (११-१)(११-३)(११-७).
पुरुष एकेरी (प्रौढ गट ४९ वर्षावरील) : अंतिम फेरी:- संतोष मेदीकुंट(ओएफडीआर)विरुद्ध सचिन सिनकर(पॉलीब्लो)यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यामध्ये संतोष मेदिकुंट(ओएफडीआर) यांनी विजेतेपद पटकावले तर सचिन सिनकर(पॉलीब्लो)यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले(११-५,११-३,११-७.)
अंतिम सामन्यामध्ये संतोष मेदिकुंट(ओएफडीआर)यांनी पुरुष एकेरी (प्रौढ गट ४९ वर्षावरील) गटाचे विजेतेपद पटकावले तर सचिन सिनकर यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
पुरुष एकेरी : अंतिम फेरी:-सुदीप अभ्यंकर(लुपिन)विरुद्ध चिन्मय दंडवते(ॲटलास कॉपको)यात झालेल्या अंतिम सामन्यात सुदीप अभ्यंकर(लुपिन)विजयी झाले व चिन्मय दंडवते(ॲटलास कॉपको) उपविजेते झाले(११-४,११-४,११-४.)
अंतिम सामन्यामध्ये सुदीप अभ्यंकर(लुपिन) यांनी पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद व चिन्मय दंडवते(ॲटलास कॉपको) उपविजेते पटकावले
पुरुष दुहेरी : अंतिम फेरी:- मनीष मुंज व अनुपम नलावडे(टाटा मोटर्स) व अमोल पाटील व उदय शिंदे(टाटा मोटर्स) यात झालेल्या सामन्यात मनीष मुंज व अनुपम नलावडे यांनी पुरुष दुहेरी गटाचे विजेते पद व अमोल पाटील व उदय शिंदे यांनी उपविजेतेपद मिळवले (९-११,११-४,६-११,११-४,५-११).

