कडाचीवाडी येथे भाईगिरी करत दहशत: दोघाजणांना अटक!

पिंपरी:” आम्ही इथले भाई आहोत,” आमचे कोणी वाकडे केले तर एकेकाला पाहून घेऊ असे मोठमोठ्याने ओरडून रस्त्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वाहन चालकाला अडवून त्याला बेदम मारहाण केली. याशिवाय फिर्यादीचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला देखील दगड फेकून मारण्यात आले. ही घटना रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी आठ वाजण्याचे सुमारास मौजे कडाचीवाडी, ता. खेड गावचे हद्दीत, बौद्ध वस्ती येथे घडली. या प्रकरणी दोघाजणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत प्रवीण विष्णू कुंभार वय 48 रा बापदेव वस्ती, मेदनकरवाडी, ता. खेड यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुयश राजेंद्र यादव, शिवम संदीप हाके ,शुभम संदीप हाके (वय 18, कडाचीवाडी), चिन्मय वाघ, सुदर्शन चौधरी सोन्या वाघमारे, विराज कृष्णा कड (वय 23, सर्व राहणार कडाचीवाडी ता. खेड) अशी आरोपींची नावे आहेत. शुभम संदीप हाके व विराज कृष्णा कड या आरोपींना दक्षिण चाकण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक ते सात यांनी फिर्यादी यांची गाडी अडवून मोठमोठ्याने आम्ही इथले भाई आहोत, तू या रस्त्याने कसा काय चालला इथून जायचे नाही. आमचे कोणी वाकडे केले तरी एकेकाला पाहून घेऊ अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली. फिर्यादीस अश्लील शिवीगाळ करून हाताबुक्याने मारहाण करून जीव घेण्याचा प्रयत्न केला. शिवाय एका व्यक्ती भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांचा देखील जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या गुंडांच्या भीतीने आज बाजूच्या घरमालकांनी आपापली घरे व दुकाने बंद करून घेतली. दक्षिण चाकण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे हे पुढील तपास करत आहेत.

