फक्त मुद्द्याचं!

27th March 2026
पुणे

संघभावना व खेळाडू वृत्ती ही खेळामुळेच वाढीला लागते : अरुण कुमार ठाकूर

संघभावना व खेळाडू वृत्ती ही खेळामुळेच वाढीला लागते : अरुण कुमार ठाकूर

औद्योगिक क्रीडा संघटनेची ६२वी क्रिकेट (टी-ट्वेंटी) स्पर्धा; अम्युनिशन फॅक्टरी संघ विजयी
 पिंपरी :  संघभावना व खेळाडू वृत्ती ही खेळामुळेच वाढीला लागते.औद्योगिक क्रीडा संघटना चांगले काम करत आहे;त्यांना या कामी अम्युनिशन फॅक्टरी सर्वतोपरी सहाय्य करील. असे आश्र्वासन उद्घाटन समयी बोलताना अरुण कुमार ठाकूर (सीजीएम अम्युनिशन फॅक्टरी), यांनी दिले.  औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ६२व्या टी-२० क्रिकेट स्पर्धेस अम्युनिशन फॅक्टरी,खडकीच्या मैदानावर आरंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटनाच्या सामन्यात एसएचटी सोल्यूशन्सचा अम्युनिशन फॅक्टरी संघाने पराभव केला.

viara vcc
viara vcc

.या स्पर्धेत टाटा मोटर्स ए,टाटा मोटर्स बी,टाटा मोटर्स सी,अम्युनिशन फॅक्टरी,अम्युनिशन फॅक्टरी-११,बजाज ऑटो ब्ल्यू,बजाज ऑटो ग्रीन,बजाज ऑटो चाकण, एसकेएफ,ॲटलास कॉपको,सँडविक एशिया,युनो मिंडा,एसएमटी मिंडा,फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स,एमक्युअर फार्मासिटिकल्स,किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड,टाटा टेक्नॉलॉजी,महिंद्रा क्लासिक लेजंडस,फॉरविया,फ्लीटगार्ड फिल्टर्स,पोस्को,भारत फोर्ज,जेसीबी,टेट्रापॅक,थरमॅक्स,टीकेआयएल,पीसीएमसी,प्राज इंडस्ट्रीज, ओएफडीआर,प्रीमियम ट्रान्समिशन,इमर्सन,महेंद्र अँड महेंद्र चाकण,एसएचटी ल्युशन्स,इनप्रो,फिलिप्स,डीओडी,एलिनडब्ल्यूजी वगैरे ३८ संघानी भाग घेतला आहे.या सर्व स्पर्धेचे सामने अम्युनिशन फॅक्टरी खडकी,टाटा मोटर्स पिंपरी व बजाज ऑटो आकुर्डी यांच्या मैदानावर होतील

स्पर्धेच्या उद्घाटनाला अरुणकुमार ठाकूर(सीजीएम अम्युनिशन फॅक्टरी),अनुप कुमार(जीएम अम्युनिशन फॅक्टरी),यशोधन गोरे(गेम इन्चार्ज क्रिकेट अम्युनिशन फॅक्टरी),शैलेंद्र जाधव(सेक्रेटरी स्पोर्ट्स कमिटी अम्युनिशन फॅक्टरी),संदेश रणदिवे,संजीव खुडे,दुष्यंत गायकवाड(सँडविक एशिया स्पोर्ट्स कमिटी),राजकुमार गुप्ता (एसएचटी सोल्युशन्स), औद्योगिक क्रीडा संघटनेचे ,सचिव वसंत ठोंबरे,सहखजिनदार विजय हिंगे,,स्पर्धाप्रमुख हरी देशपांडे,आर्यन ट्रॉफी वर्ल्डचे अमित कदम,थरमॅक्स स्पोर्ट्स कमिटीचे गिरीश गायकवाड,चेतन,उत्कर्ष स्पोर्ट्स अकादमीचे मंदार कुलकर्णी,ज्येष्ठ खेळाडू मुकेश गुजराती,रियाज उतावळे उपस्थित होते. सुरुवातीला औद्योगिक क्रीडा संघटनेचे खजिनदार प्रदीप वाघ यांनी प्रास्ताविक केले. औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम यांनी सूत्रसंचालन केले

औद्योगिक क्रीडा संघटनेच्या टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे पहिल्या फेरीचे निकाल खालील प्रमाणे
अम्युनिशन फॅक्टरी क्रीडांगण •
१) अमिनेशन फॅक्टरी-१0१- ५ गडी राखून विजयी . ताराप्रकाश मौर्य सामनावीर
•एसएचटी सोल्यूशन्स ९८ धावा १४.४ षटके :-हार्दिक मोरे ४८,ताराप्रकाश मौर्य २९/४,वैभव वारके २३/२,प्रवीणकुमार २३/२.
•अम्युनिशन फॅक्टरी- १०१ धावा १५.४ षटके ५ बाद:-ओंकार करपे ३६,प्रमोद मोरे २०,गिरीश पाटील ८/३.
२) एमक्युअर संघ आठ गडी राखून विजयी. शहाबाद सय्यद सामनावीर
•टाटा मोटर्स बी १२० धावा १८-५ षटके :-अविनाश तिकोने १९,चिन्मय अभंगराव ५२,शहबाज सय्यद २०/३,ऋतव मेहता १२/२.
•एमक्युअर १२१ धावा १२-२ षटके:-२ बाद रितेश धाडवे ४१,शहबाज सय्यद ५९,सुब्रतो २७/२.च

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"