दुनियादारी परिवाराचा ‘एक्सलन्स अवॉर्ड’ स्वाती साठे यांना प्रदान !

पुणे : शहरातील दुनियादारी परिवार वतीने दरवर्षी दिला जाणारा ‘एक्सलन्स अवॉर्ड’ श्रीमती स्वाती साठे पोलीस उपमहानिरीक्षक, यांना त्यांच्या समाजसेवा आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल नुकताच प्रदान करण्यात आला.
दुनियादारी या संस्थेची स्थापना 2014 साली करण्यात आली. सुरुवातीला केवळ पाच सदस्य घेऊन या समूहाची स्थापना झाली. कालांतराने विविध विषयांवरील समुह तयार झाले, व्यवसाय ,सुरमयी लेखन, इत्यादी समूह तयार झाले. आज या परिवाराची एक हजार सदस्य संख्या आहे. दुनियादारी संस्थेच्या वतीने आजपर्यंत अनेक गरजू व्यक्तींना आर्थिक व विविध प्रकारची मदत करण्यात आली आहे. तसेच दरवर्षी दुनियादारी संस्थेच्या वतीने पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. दुनियादारीस अनेक पारितोषिके मिळाली असुन, त्याचा स्विकार समीर सप्रे यांनी दुनियादारी संस्थेमार्फत स्विकारला.

श्रीमती स्वाती साठे यांना पुरस्कार प्रदान करतेवेळी आपल्या भावना व्यक्त करताना दुनियादारी परिवाराचे प्रल्हाद साळुंखे यांनी सांगितले की, सेवा परमो धर्म: या तत्वाचा अवलंब करत, तुम्ही समाजाच्या कल्याणासाठी अतुलनीय कार्य केले आहे. तुमच्या नेतृत्वाने आणि करुणेने असंख्य जीवनांना आधार दिला आहे. न्याय आणि सामाजिक कल्याण यामध्ये तुम्ही पूल बांधून समाजाच्या उत्थानासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तुमच्या कृतींमधून मानवतेला एक संरक्षक मिळाला आहे. तुमचे कार्य इतरांना समर्पणाने सेवा करण्यासाठी प्रेरित करते. दुर्बलांना सक्षम करत, तुम्ही अंधारात आशेचा किरण आणला आहे. तुमची कर्तव्यनिष्ठा केवळ गणवेशापुरती मर्यादित नसून, ती मनापासून समाजासाठी समर्पित आहे. तुमची सेवा म्हणजे नि:स्वार्थी योगदान आणि सामाजिक परिवर्तनाचा एक दीपस्तंभ आहे. तुमच्या कार्याचा ठसा केवळ शब्दांत नाही, तर तुम्ही स्पर्श केलेल्या प्रत्येक जीवनात उमटला आहे. समाजाच्या उन्नतीसाठी तुमच्या अथक सेवेला मानाचा मुजरा!
या कार्यक्रमात दुनियादारीचे अध्यक्ष प्रल्हाद साळुंखे व समीर सप्रे यांच्यासह पोलीस डिपार्टमेंटचे वायचळ प्रिन्सिपल, पाटील, ढमाळ तुरुंग अधिकारी व डॉक्टर जी. डी. चव्हाण तसेच माजी आर. एम. ओ. ठाणे प्रदीप करंजुले बिल्डर व दुनियादारीचे सर्व सदस्य उपस्थित होते.