फक्त मुद्द्याचं!

19th February 2026
कला साहित्य

सुर्वे माणुसकीचा कैवार घेणारे कवी : डॉ. श्रीपाल सबनीस

सुर्वे माणुसकीचा कैवार घेणारे कवी : डॉ. श्रीपाल सबनीस

पिंपरी : ‘नारायण सुर्वे हे माणुसकीचा कैवार घेणारे कवी होते’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी रोजी आदर्शगाव हिवरेबाजार, जिल्हा अहिल्यानगर येथे काढले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित काव्यजागर संमेलनात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते.

viara vcc
viara vcc

महाराष्ट्र शासनाच्या आदर्शगाव संकल्प आणि प्रकल्पाचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार अध्यक्षस्थानी आणि स्वागताध्यक्षपदी श्रमश्री बाजीराव सातपुते होते; याशिवाय लघुउद्योजक इंद्रजित पाटोळे, कामगारभूषण राजेंद्र वाघ, हिवरेबाजारच्या सरपंच विमल ठाणगे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी हिवरेबाजार येथील यशवंत माध्यमिक विद्यालयाला पद्मश्री नारायण सुर्वे संस्कारक्षम शिक्षणसंस्था पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. त्याचबरोबर संस्कारक्षम गृहिणी प्रभावती विठ्ठल वाघ (मास्तरांची सावली – कृष्णाबाई सुर्वे सन्मान), ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतीश गोरडे (पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार), कविवर्य म. भा. चव्हाण (पद्मश्री नारायण सुर्वे काव्यसाधना पुरस्कार), कवयित्री मानसी चिटणीस (पद्मश्री नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार) यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रतिमा काळे, प्रभाकर वाघोले, राजेंद्र वाघ, ललिता सबनीस आणि पुरस्कारार्थी कवींनी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे अभिवाचन करीत काव्यजागर केला.

डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘स्त्री, कामगार, कष्टकरी, दलित, वंचित यांच्यातील माणसाचा सुर्वे यांनी नेहमी सन्मान करीत गांधीवाद अन् मार्क्सवाद यांची बेरीज केली. हिवरेबाजार म्हणजे धर्मनिरपेक्ष भारताचे प्रतीक आहे!’ सतीश गोरडे यांनी, ‘वकिली व्यवसायाच्या माध्यमातून तुटणारी कुटुंबे आणि दुभंगणारा समाज जोडण्याची संधी लाभली!’ अशी भावना व्यक्त केली. म. भा. चव्हाण यांनी ‘आई’ आणि डॉ. विठ्ठल वाघ यांनी ‘तिफन’ या कवितांचे सादरीकरण करीत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले; . पोपटराव पवार यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘आमच्या शाळेतील विद्यार्थी येथे आलेल्या उत्तुंग प्रतिभेच्या कवींकडून काव्यलेखनाची प्रेरणा घेतील!’ असा विश्वास व्यक्त केला.

पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविकातून पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रमांचे नियोजन असून हे त्यातील पाचवे पुष्प आहे, अशी माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, राजगुरूनगर शाखेच्या वतीने पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राजू जाधव, प्रदीप गांधलीकर

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"