धरणांच्या पाण्यावर राज्य सरकारची फ्लोटिंग सोलर प्रकल्प उभारण्याची तयारी !

सांगोला : धरणात असलेल्या पाण्याचे कमीत कमी बाष्पीभवन होण्यासाठी आता राज्यातील धरणांच्या पाण्यावर राज्य सरकार फ्लोटिंग सोलर प्रकल्प उभारण्याची तयारी करत आहे .यासाठी एनटीपीसी सारख्या भारत सरकारच्या कंपन्यांकडे विचारणा करण्यात आली आहे .असा दावा राज्य जलसंपदा मंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
धरणात मुबलक जागा असल्याने या ठिकाणी पाण्यावर फ्लोटिंग सोलर पॅनल बसवल्यावर पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल आणि निर्माण होणाऱ्या सोलर एनर्जी मधून जलसंपदा विभागाला उत्पन्नही मिळेल असा दावा राज्य जलसंपदा मंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. सांगोला येथे आयोजित एकविसाव्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचे उद्घाटन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्यांनी धरणातील गाळ काढणे ,वाढते नागरीकरणामुळे शेतीच्या पाण्याचा तुटवडा ,नद्या जोड प्रकल्प अशा अनेक विषयांवर शासनाची भूमिका मांडली सिंचन परिषदेत परिषदेतून तज्ञांनी सरकारला सूचना द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली .त्यानंतर राज्य सरकार याचा रोड मॅप बनवू शकेल असे त्यांनी सांगितले. विखे पाटील पुढे म्हणाले की सध्या वाढत्या नागरकीकरणामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे वेळापत्रकही बदलू लागले आहे अशा वेळी धरणात असलेल्या पाण्याचे कमीत कमी बाष्पीभवन होण्यासाठी राज्यातील धरणांच्या पाण्यावर फ्लोटिंग सोलर प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न करत आहे.

महापालिका नद्यांचे प्रदूषणाला जबाबदार
राज्यातील नद्यांचे प्रदूषण हा एक गंभीर प्रश्न आहे. राज्यातील महापालिका मुख्यत्वे करून या प्रदूषणाला जबाबदार आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते पाणी सर्रासपणे नद्यांमध्ये सोडले जाते, त्यामुळे नद्यांची अवस्था वाईट बनत चालली आहे. नगरपालिका आणि ग्रामपंचायती देखील सांडपाणी प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडते. मात्र नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना पुरेसा निधी नसल्याने ते प्रक्रिया करून सांडपाणी नदीत सोडू शकत नाही .महापालिकांकडे निधी असूनही त्यांचे सांडपाणी प्रक्रिया न करता नद्यात सोडले जाते .नगरपालिका आणि ग्रामपंचायत यांनी सोडलेले पाणी एकत्रित करून त्यावर जलसंपदा विभाग प्रक्रिया करून नदीत सोडण्याचा विचार करीत आहे. नदीत येणारे पाणी स्वच्छ असल्यास प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे भविष्याच्या दृष्टीने गरजेचे आहे असा दावा विखे पाटील यांनी केला आहे.