फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
महाराष्ट्र शिक्षण

शाळांमध्ये बसवणार पॅनिक बटण?

शाळांमध्ये बसवणार पॅनिक बटण?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी :बदलापूरमधील बालिकांच्या अत्याचार विरोधात राज्यभर खूप आंदोलनं झाली. आता या प्रकरणी राज्य सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अहवालावर बुधवारी चर्चा करण्यात येणार आहे,शाळांमध्ये पॅनिक बटण बसविले जावे, यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

दीपक केसरकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते. “विविध विभागांची एकत्र समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीला महिला आयोगाच्या अध्यक्ष, बालहक्क आयोगाच्या अध्यक्ष आणि आयजी पोलीस विभागाला विशेष मार्गदर्शक म्हणून बोलावले आहेत. याचा सविस्तर अहवाल उद्या प्राप्त होऊन बुधवारी यावर चर्चा करू”, असं दीपक केसरकर म्हणाले.

शाळांमध्ये पॅनिक बटण आणण्यासाठी प्रस्ताव
ते पुढे म्हणाले की, “अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर संपूर्ण सिस्टम बदलावी लागेल. या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय कालच्या बैठकीत झाला. मी राज्यमंत् असताना एक प्रस्ताव सादर केला होता. आपण पॅनिक बटण शाळांमध्ये लावावं आणि महिलांना द्यावं. महिला आणि मुलं अडचणीत आल्यावर पॅनिक बटण दाबल्यास पोलिस ठाण्यात त्वरीत माहिती कळते. मग ट्रॅकिंग सिस्टममुळे पोलिसांपर्यंत ही संबंधित व्यक्ती कुठे गेली हे समजतं. ही सिस्टम ऑफलाईनही चालते. हैदराबादमधील एका कंपनीने हे बटण तयार केलं आहे. हे सुरू केलं तर अशा घटनांवर नियंत्रण येईल.”

केसरकर म्हणाले की, शाळा आदिवासी विकास खात्याच्या शाळांवर आमचा थेट कंट्रोल येत नाही. एकाच विभागाचं पूर्ण नियंत्रण शाळा प्रशासनावर असावा. जिल्हा परिषद आणि शिक्षण विभाग या दोघांचंही नियंत्रण आमच्या शाळांवर असतं. त्यामुळे अनेकवेळा अंमलबजावणीत स्मुथनेस राहत नाही. जिल्हा परिषदेचे सीईओच्या पातळीवर निकाल होत असतात. शिक्षकांसंदर्भातील निर्णय शिक्षण विभागाकडे देण्यात यावे असं बोलणं झालंय.”

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"