फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पुणे

लोकप्रतिनिधींवरील फौजदारी दाव्यांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालय

लोकप्रतिनिधींवरील फौजदारी दाव्यांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालय

पुणे : लोकप्रतिनिधींवर दाखल असलेल्या फौजदारी दाव्यांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात ” एमपी एमएलए’ या विशेष न्यायालयात होणार आहे.

जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांच्याविरोधात फौजदारी संहिता 1973 (2, 1974), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 (46) आणि रिट पिटीशन (क) क्र 699, 2016 या अंतर्गत दाखल सर्व दावे नियुक्त केलेल्या न्यायदंडाधिकारी यांच्या विशेष न्यायालयात चालविले जातील, अशी अधिसूचना उच्च न्यायालयाने काढली आहे. या विशेष न्यायालयात सर्व आजी व माजी खासदार आणि आमदारांचे फौजदारी दावे आता चालविले जातील.

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या ‘कलम 202’नुसार सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिले होते.

न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता न केल्याने पोलिसांना नोटीसही बजावण्यात आली होती. अखेर पोलिसांनी तपासणी अहवाल सादर केला. त्यामध्ये राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. आता यापुढील काळात राहुल गांधी यांच्या खटल्याची सुनावणी याच” एमपी एमएलए’ या विशेष न्यायालयात होणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"