फक्त मुद्द्याचं!

26th June 2025
महाराष्ट्र

1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प राज्यात उभारणार!

1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प राज्यात उभारणार!

मुंबई : राज्यात शाश्वत विकासास चालना देण्यासाठी महानिर्मितीतर्फे 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प दोन अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार आहेत . या प्रकल्पामुळे राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे . महानिर्मिती ही म.रा .वि.म सूत्रधारी कंपनी मर्यादित या कंपनीची संपूर्ण मालकीची उपकंपनी असून सुमारे 13880 मेगावॅट क्षमतेसह भारतातील सर्वात मोठ्या राज्य नियंत्रित विद्युत उत्पादकांपैकी एक आहे .

पारंपारिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीस पुरवठा देऊन शेतीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे औष्णिक वायू जलविद्युत आणि सौर असे ऊर्जा उत्पादन क्षेत्रात वैविध्य असलेली महानिर्मिती ही कंपनी नवीकरणीय ऊर्जेचे प्रकल्प सुरू करत आहे ज्यामुळे वीज ग्राहकांना कमी दरात वीस पुरवठा करत कार्बन उत्सर्जनात घट होण्यास मदत होणार आहे द रॉकफेलर फाउंडेशन फाउंडेशन आणि बेजार अर्थ फंड यांच्या सहकार्याने स्थापन झालेली जी इ पी इंडिया ही संस्था विकसनशील देशांमध्ये न्याय समतोल व वेगवान हरित ऊर्जेसाठी मदत करते .

viarasmall
viarasmall

वितरण क्षम ऊर्जेसाठी उपयुक्त उपक्रमांची अंमलबजावणी जी ई ए पी पी इंडिया ही जी ए पी पी एलएलसीची भारतीय शाखा आहे . जी इ ए पी पी इंडिया, ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट व महानिर्मितीतर्फे सेंट्रल डॅशबोर्ड तयार करण्यात येणार असून या मार्फत जमीन संपादन ते प्रकल्प उभारणी प्रगती यांचे दैनंदिन तत्त्वावर अवलोकन करण्यात येणार आहे सर्व भागधारकांसाठी या डॅशबोर्ड वापराबाबतचे प्रशिक्षण देण्यात येऊन हे सौर प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगण्यात आले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"