स्मृती मानधना व पलाश मच्छूल यांचा विवाह सोहळा स्थगित!

स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने विवाह सोहळा स्थगित
सांगली : महिला वर्ल्ड कप विजेती क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा आज होणारा लग्न सोहळा स्थगित करण्यात आला .स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले .त्यामुळे आजचा लग्न सोहळा स्थगित करण्यात आल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे .

स्मृतीच्या वडिलांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. स्मृती मानधनाचे लग्नापूर्वीचे सर्व विधी शुक्रवार 21 नोव्हेंबर पासून सुरू झाले होते .स्मृतिची हळद, मेहंदी ,संगीत सोहळा या दिवसांमध्ये पार पडला .या सोहळ्याचे फोटो ,व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सांगलीतील समडोळी येथील मानधना फार्म हाऊसवर स्मृती पलाशच्या लग्न सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली होती. दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त होता.
दोघांच्याही कुटुंबातील सर्व नातेवाईक व चाहते मंडळी लग्न सोहळ्यासाठी हजर झाली होती. परंतु स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने हा सोहळा स्थगित करण्यात आला आहे .वडिलांची प्रकृती चांगली होत नाही तोपर्यंत आपण लग्न करणार नाही असे स्मृतिने सांगितले आहे.

