फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
गुन्हेगारी

जमिनीवर बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी आलेल्या जमावाची सहा जणांना मारहाण!

जमिनीवर बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी आलेल्या जमावाची सहा जणांना मारहाण!

नऊ जणांना अटक
पिंपरी : जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा घेण्यासाठी आलेल्या ४० ते ५० जणांच्या जमावाने सहा जणांना बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. ७) दुपारी हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी
पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.

रोहित राजेंद्र गायकवाड, विकी प्रभाकर वरतले, आकाश अर्जुन झोंबाडे, सागर एकनाथ गायकवाड, नितीश सुरेश सदाफुले, रियाज जीवन शेख, अनिकेत विलास काळे, जयेश मनानी नखाते, हितेश अनिल पाटील अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार प्रभाकर जांभुळकर याच्यासह ४० ते ५० जणांच्या जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप बबन भिंताडे (वय ४२, रा. कासारसाई, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्रदीप हे त्यांचे मित्र बाबासाहेब साखरे, जालिंदर जांभुळकर, सचिन घुले यांच्यासह त्यांच्या जागेत बसले होते. त्यावेळी ४० ते ५० जणांचा जमाव जागेचा बेकायदेशीरपणे ताबा घेण्यासाठी आला. जमावाला अडविण्यासाठी सुरक्षारक्षक केतन मुळक व प्रथमेश वाघमारे हे गेले असता त्यांना व फिर्यादींना कोयता, बांबू, दगडाने जमावाने मारहाण केली. त्यानंतर भिंताडे यांच्या तीन मित्रांना देखील मारहाण करून जखमी केले.
तसेच, जागेमध्ये ठेवलेल्या कंटेनर मधील टीव्ही, टेबल, खुर्च्या, सीसीटीव्ही कॅमेरा, लाकडी कपाट आदी साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. फौजदार ताकतोडे तपास करीत आहेत.

viarasmall
viarasmall

मारहाण करत कामगारांना लुटणार्‍या तिघांवर गुन्हा!

पिंपरी : रस्त्याने पायी जात असलेल्या कामगारांना अडवून त्यांच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १३ मे रोजी पहाटे भांबोली येथे घडली.
आनंदकुमार दीपककुमार स्वाईन (वय १९, रा. भांबोली) यांनी ८ जून रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यश संतोष लोंढे, पंकेश दत्तात्रय जाधव, सुरज कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आनंदकुमार हे त्यांच्या तीन मित्रांसोबत पायी जातहोते. त्यावेळी त्यांना रस्त्यात अडवून आरोपींनी मारहाण केली. आनंदकुमार यांच्या मित्राच्या खिशातून पाचशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच, फिर्यादी यांच्या फोन पे अ‍ॅप वरून आरोपी पंकेश जाधव याच्या खात्यावर एक हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेत जीवे मारण्याची धमकी दिली.
फौजदार दत्तात्रय जाधव तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"