फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
गुन्हेगारी

चाकण बहुल दरोड्या प्रकरणी फरार सहा जणांना अटक!

चाकण बहुल दरोड्या प्रकरणी फरार सहा जणांना अटक!

चाकण : बहुल गावात झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला यापूर्वीच अटक केली होती ,मात्र अन्य आरोपी फरार होते .चाकण पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर ,नगर तालुका, बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा येथे गेले महिनाभर ट्रॅप लावला होता. या ट्रॅप मध्ये सहा जणांना ताब्यात घेतले आहे .त्यात एक अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे .

ताब्यात घेतलेल्यांमध्ये भीमा आदेश काळे, परश्या गौतम काळे ,धंग्या चंद्र भोसले, राजेश अशोक काळे,अक्षय उर्फ किशोर हस्तलाल काळे यांचा समावेश आहे. या दरोडेतील मुख्य आरोपी सचिन चंद्र भोसले याला पोलिसांनी तीन मार्च रोजी अटक केली आहे .आरोपींकडून बारा लाख रुपये किमतीचे 13 तोळे सोन्याचे दागिने ,रोख रक्कम, तीन हत्यारे असा एकूण 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .आरोपींनी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा दरोडे टाकल्याचे उघड झाले आहे .24 फेब्रुवारी रोजी पहाटे बहुळ गावातील फुलसुंदर वस्ती येथे जयराम लक्ष्मण वाडेकर यांच्या घराचा दरवाजा तोडून पाच ते सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. जयराम यांचा मुलगा अशोक आणि त्याची पत्नी उज्वला यांच्यावर चाकूने वार केले.

viara ad
viara ad

दरोडेच्या घटनेतील आरोपी पुन्हा दरोडा टाकण्यासाठी चिंचोशी गावात आले असल्याची माहिती मिळाल्यावर उपायुक्त शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड यांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दरोडेखोर टप्प्यात येताच अटक करण्यासाठी पोलीस सरसावले ,असता एका,दरोडेखोराने पोलिसांवर हल्ला केला .या हल्ल्यात पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड हे जखमी झाले होते. दरोडेखोरांकडून चोरीचे दागिने खरेदी करणारा सोनार अभय विजय पंडित वय 38 श्रीगोंदा अहिल्यानगर याला पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिसायुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस ,उपायुक्त परिमंडळ 3 डॉक्टर शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ ,पोलीस निरीक्षक गुन्हे नाथा घारगे, तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, गणपत धायगुडे यांनी यांनी या तपासात सहकार्य केलेआहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"