सीताराम येचुरी यांचे निधन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे आज नवी दिल्लीत निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.
सीताराम येचुरी यांना दिल्लीतील एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. येचुरी यांना श्वसनमार्गाच्या संसर्गाने त्रस्त होते, यामुळे त्यांच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाली होती. सीताराम येचुरी यांना १९ ऑगस्ट रोजी ताप येण्याच्या तक्रारीनंतर एम्सच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
सीताराम येचुरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट केले की, ‘सीताराम येचुरीजी माझे मित्र होते. ते भारताच्या विचाराचे संरक्षक होते आणि त्यांना आपल्या देशाची सखोल माहिती होती. त्यांच्याबरोबर झालेल्या प्रदीर्घ याची मला नेहमीच आठवण येईल. या दु:खाच्या वेळी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि अनुयायांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना.
सीताराम येचुरी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) सरचिटणीस होते. १९९२ पासून ते सीपीआयच्या पॉलिट ब्युरोचे सदस्यही होते. येचुरी २००५ ते २०१७ पर्यंत पश्चिम बंगालमधून राज्यसभेचे खासदार होते. येचुरी १९७४ मध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियामध्ये सामील झाले आणि एका वर्षानंतर, ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) मध्ये सहभागी झाले होते.