श्रावण काव्यसरीत रसिकांना केले चिंब !

इंद्रायणी साहित्य परिषदेचे श्रावणी कविसंमेलन
मोशी : श्रावणासारख्या प्रसन्नता देणार्या सरी पाहिजे असतील तर कर्तृत्वाची रिमझीम आपणच निर्माण केली पाहिजे. सफलतेचा श्रावण नेहमी जीवनात राहण्यासाठी आत्मविश्वासाचे आभाळ भरून यायला लागते असे ज्येष्ठ कवयित्री वर्षा बालगोपाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले., ‘ इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने कवयित्रींसाठी मोशी येथे ” सखे श्रावण श्रावण ” श्रावणी कविसंमेलन सोमवारी (दि १८) झाले. त्यात श्रावणावर कविता सादर झाल्या. काव्यरचनांमधून रसिकांना चिंब केले. काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री वर्षा बालगोपाल होत्या.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे, अशोकराव ढोकले आदी उपस्थित होते.यावेळी सखे श्रावण श्रावण ” या काव्यमैफिलित प्रभा शांताराम वाघ, श्रद्धा विनोद चटप, मेहमूदा शेख, प्रगती तारसे, राजश्री मानकर, नेहा शेटे, शिल्पा नंदकुमार फाकटकर, आशा विनायक जगताप, मीना बिरंगळ, प्रा.प्रीती देवेंद्र डूबे, अर्चना पाटील, सीमा संतोष जाधव, सुवर्णा पवार, वंदना मारुती खोत, गायत्री सतीश पाटील, जयश्री श्रीखंडे, स्वाती हर्षद काथवटे, तृप्ती थोरात- कळसे, पल्लवी पाटील, सुनिता पडवळ, हेमांगी बोंडे, प्रतिमा अरुण काळे, मनिषा शिंदे, सिद्धी काटकर नलवडे, एस्तेर बर्नाट, श्रुती वाकडकर, प्रज्ञा दत्तात्रय वाघ, अंकिता शिंदे, गीतांजली शेटे, अलका भवारी इत्यादी या तीस कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पौर्णिमा कोल्हे, डॉ. सीमा काळभोर, रामभाऊ सासवडे, गणेश सस्ते यांनी या मैफिलीचे आयोजन केले.
सौ. तेजस्विनी देशमुख यांनी प्रास्ताविकात इंद्रायणी साहित्य परिषदेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, संस्थापक अरुण बोऱ्हाडे, सुनिल जाधव, विठ्ठल कामठे, नागेश गव्हाड उपस्थित होते. सौ. संगीता थोरात यांनी आभार मानले.