साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी शिवेंद्रराजे भोसले!

सातारा : साताऱ्यात 32 वर्षानंतर होणाऱ्या 99 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली आहे ,अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली .

साताऱ्यात मराठी साहित्य संमेलन व्हावे अशी मागणी मावळा फाउंडेशन या संस्थांनी केली होती . मावळा फाउंडेशन आणि अखिल मराठी साहित्य संमेलन या दोन्ही संस्थांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली .अध्यक्ष स्थानी महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी होते . ज्येष्ठ साहित्यिक किशोर बेडकीहोळ यांनी स्वागताअध्यक्ष पदासाठी शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव सुचवले. साताऱ्यात यापूर्वी 1993 मध्ये 66 वे अखिल भारतीय संमेलन झाले होते या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष अभय सिंह राजे भोसले होते . आता त्यांचे पुत्र शिवेंद्रराजे भोसले यांना हा सन्मान मिळाला आहे . शताब्दी पूर्व साहित्य संमेलन अतिशय देखणे आणि दिमागदार करून दाखवू असे शिवेंद्रराजे म्हणाले.

