राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश अध्यक्षपदी शशिकांत शिंदे!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश अध्यक्षपदी माथाडी कामगार नेते माजी आमदार शशिकांत शिंदे यांची एकमताने आज निवड करण्यात आली .जयंत पाटील यांनी प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे यांची निवड करण्यात आली .
शिंदे हे शरद पवारांचे विश्वासू सहकारी मानले जातात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मंगळवारी दिनांक 15 रोजी महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली .या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली .मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला ,त्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली .शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटी नंतरही त्यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही .

पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा मोठा अनुभव आहे .शशिकांत शिंदे हे जावळी तालुक्यातील होमगाव येथील रहिवासी आहेत . वाणिज्य शाखेचे पदवीधर असणारे शिंदे हे माथाडी कामगारांचे प्रभावी नेते आहेत . 1999 मध्ये प्रथम शिंदे यांनी जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली .महाराष्ट्र राज्याच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले . 2024 मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कडून भाजपच्या महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

