शेअर्स गुंतवणूक;15 लाख 35 हजार रुपयांना गंडा!

पिंपरी : शेअर्स गुंतवणूक व आयपी ॲप मध्ये गुंतवणूक केलेल्या अकाउंट वर 55 लाख बॅलन्स दिसून आल्याने ते काढण्यासाठी शॉर्ट टर्म कॅपिटल भरण्यासाठी सांगून एकूण पंधरा लाख 35 हजार 117 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 24 डिसेंबर 2025 ते 21 जानेवारी 2026 यादरम्यान ऑनलाईन घडली.

याबाबत एका व्यक्तीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रेम प्रकाश वर्मा (वय 50), तनिया शेख (वय 35), आनली (वय 30) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी प्रेम वर्मा न्यू बुक कलेक्टिव्ह व्हाट्सअप वर समाविष्ट करून त्यानंतर आरोपी क्रमांक एक यांनी ए इन्व्हेस्टमेंट क्लब इंटरनशिप या नवीन व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील केले. आरोपीच्या सांगणेवरून फिर्यादी यांनी 24 डिसेंबर 2025 ते २१/१/२०२६ या दरम्यान शेअर्स व आयपी घेत गेले. त्यानंतर फिर्यादीच्या अकाउंटवर 55 लाख रुपये बॅलन्स दिसून आला. त्यानंतर फिर्यादीने अकाउंटवरून पैसे काढायचे ठरविले. तेव्हा आरोपींनी सहा लाख 62 हजार 117 रुपये शॉर्टटर्म कॅपिटलगेन टॅक्स भरायला सांगितला.
आरोपी क्रमांक तीन हिने एका अकाउंट नंबर वर पैसे भरण्यास सांगून पैसे भरल्यानंतर लगेच तीनही आरोपींनी व्हाट्सअप ग्रुप सोडले या प्रकारानंतर फिर्यादीने आरोपी यांना फोन व फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यास उत्तर दिले नाही. त्यावेळी फिर्यादी यांना समजून आले की शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून जास्तीत जास्त नफा मिळवून घेण्याचे अमिष दाखवून पंधरा लाख 35 हजार 117 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगून फसवणूक केली. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कडलग पुढील तपास करत आहेत.

