शरद पवारांनी नाकारली झेड प्लस सुरक्षा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मी स्वतः आधी मला कोणत्या प्रकारचा धोका आहे का, हे पडताळून पाहीन आणि त्यानंतरच झेड प्लस सुरक्षा घ्यायची की नाही, यावर निर्णय घेईन, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारकडून मिळालेल्या झेड प्लस सुरक्षेला नाकारली आहे.
नवी दिल्लीत गृहखाते आणि केंद्र सरकारची बैठक आज पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी नकार दिला आहे. सुरक्षा नाकारण्यामागे शरद पवारांनी कारण सुद्धा सांगितले आहे. शरद पवार म्हणाले की, मी स्वत: आधी मला कोणत्या प्रकाराचा धोका आहे का ते पडताळून पाहीन त्यानंतर झेड प्लस सुरक्षा घ्यायची की नाही यावर निर्णय घेईन.
केंद्रीय गृहखात्याला कोणत्या अशा गोष्टींमुळे शरद पवारांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे वाटते, त्या सर्व संभाव्य धोकादायक बाबीची यादी थेट पवारांनी गृहखात्याकडे मागितली आहे. याआधी सुद्धा शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षेसाठी विचारणा करण्यात आली होती तसेच सुरक्षा देण्याचे केंद्राकडून जाहीर करण्यात आले होते पण शरद पवारांनी सुरक्षा नाकरली होती.