पिंपळे सौदागर मध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सात तरुणींची सुटका!

पिंपरी : गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पिंपळे सौदागर मधील स्पाच्या आड चालणारा वेश्याव्यवसाय उघडकीस आणला आहे .पोलिसांनी या कारवाईनंतर इतर राज्यातील सात तरुणींची सुटका केली.

त्यात नागालँड तीन, मिझोराम एक, त्रिपुरा एक, केरळ एक आणि महाराष्ट्र एक या राज्यातील महिलांचा समावेश आहे .याप्रकरणी स्पा सेंटरचा मालक अभिजीत लॉरेन्स (30 रा. पिंपळे सौदागर, मूळ राहणार तिरुअनंतपुरम ,केरळ )याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान आणि पिता कायद्यानुसार पुन्हा दाखल करून अटक केली आहे .पिंपळे सौदागर येथील रोस आयकॉन बिल्डिंग मधील शॉप क्रमांक 201 ते 204 मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. माहितीची खातर जमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शहनिशा केली .
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. यावेळी सात तरुणीची सुटका करण्यात आली .चौकशीत स्पा मालक अभिजीत लॉरेन्स हा तरुणींना पैशाचे आम्हीच दाखवून या अवैध व्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली .पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे ,पपोलीस सहायुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, गुन्हे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार ,सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते ,सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, मारुती करचुंडे यांच्या पथकाने केली.

