फक्त मुद्द्याचं!

14th February 2026
गुन्हेगारी

जमीन व्यवहारात सव्वासात लाखांची फसवणूक!

जमीन व्यवहारात सव्वासात लाखांची फसवणूक!

पिंपरी : जमीन विक्रीच्या बहाण्याने ७ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना धानोरे (ता. खेड) येथे घडली. याप्रकरणी तीन जणांच्‍या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दत्तात्रय विश्वनाथ रोडके (धानोरे, ता. खेड), मंदाबाई उर्फ मंदा गौतम गरुड (वय ५७, धानोरे) व सोनाबाई शशिकांत सुमुखराव (वय ४५, कळस, पुणे) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. निलेश भगवान चोडके (वय ४०, बोडकेवाडी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी आळंदी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्‍याकडून धनादेशाद्वारे सात लाख २५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. त्‍याबदल्‍यात फिर्यादी यांना जमीन देण्याचे आश्वासन दिले; मात्र ती जमीन दुसऱ्यालाच विकली. तसेच फिर्यादी यांचे पैसेही परत केले नाहीत. आळंदी पोलिस तपास करीत आहेत.

viara vcc
viara vcc

किरकोळ वादातून लाकडी काठीने मारहाण!
पिंपरी : मोटारसायकलवरून झालेल्या किरकोळ वादातून तरुणांवर लाकडी काठी व दगडाने हल्ला केला ही घटना भोसरीतील शांतीनगर परिसरात गुरुवारी (१२ फेब्रुवारी) सायंकाळी सात वाजताच्‍या सुमारास घडली.

ओंकार प्रसाद (वय १८), लक्ष्मीपुत्र धनगर (वय २२) व सागर गुंजाळ (वय १९, सर्व रा. शांतीनगर, भोसरी) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. गोविंद बासू चव्हाण (वय २५, शांतीनगर, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्‍यांनी याबाबत भोसरी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्‍या सुमारास शांतीनगर, भोसरी येथे झालेल्‍या किरकोळ वादातून आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून फिर्यादी व त्याच्या भावास लाकडी काठीने मारहाण केली. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"