ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती स्थिर!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुबी रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. आज त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यापूर्वी रुबी रुग्णालयाच्या पथकाने बारामती येथे जाऊन पवारांची तपासणी केली होती. त्यानंतर त्यांना पुण्यात रुबी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांना थकवा आल्याने व छातीत कफ झाल्याने अस्वस्थ वाटत होते. रुग्णालयाने त्यांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या असून तपासणीचा अहवाल आल्यानंतर उपचार कसा करायचा याबाबत सांगितले जाईल असे रुग्णालयाचे डॉक्टर अभिजीत लोढा यांनी सांगितले. पवारांना किती दिवस रुग्णालयात ठेवायचे याबाबत अहवाल आल्यानंतरच ठरवता येईल असे ते म्हणाले .
आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, पवारांची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात गर्दी करू नये. मी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली आहे त्यामुळे कुठेही घाबरण्यासारखे किंवा चिंता करण्यासारखे अजिबात काहीही नाही. गेल्या 12, 13 दिवसात पवार साहेब बऱ्याच ठिकाणी जात होते. आणि लोकांना भेटत होते. यामुळे ताण आला कप झाला आहे असे त्यांनी सांगितले.

