फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
कला साहित्य

जेष्ठ शास्त्रीय गायक पं प्रभाकर कारेकर यांचं निधन!

जेष्ठ शास्त्रीय गायक पं प्रभाकर कारेकर यांचं निधन!

मुंबई : दमसास, पल्लेदार ताना, धारदार आवाजात तडफदारपणे नाट्यपदे सादर करत रसिकांची वाहवा मिळवत अफाट लोकप्रीयता मिळवणारे प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं दीर्घ आजारानं काल (12 फेब्रुवारी) रात्री निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. गेल्या तीन वर्षांपासून ते यकृताच्या आजारानं ग्रस्त होते. प्रभाकर कारेकर यांचं पार्थिव दादर येथील त्यांच्या घरी आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वाजता दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

नभ मेघांनी आक्रमिले, बोलावा विठ्ठल.. पाहावा विठ्ठल, करिता विचार सापडले वर्म, वक्रतुंड महाकाय अशा गाजलेल्या गाण्यांसह नाट्यपदां ठुमऱ्या, नाट्यपदं सुरेल आणि गायनातील रंजकतेनं पं प्रभाकर कारेकर प्रसिद्ध होते.

बाणेदार अन् धारदार आवाज
पंडित प्रभाकर कारेकर यांचा जन्म 1944साली गोव्यात झाला होता. पण त्यांचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण पंडित सुरेश हळदणकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित सी आर व्यास यांच्याकडं मुंबईत झालं होतं. बाणेदार आणि धारदार आवाजाचे धनी म्हणून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि मराठी नाट्यसंगीतात त्यांची ओळख होती. बोलावा विठ्ठल… पाहावा विठ्ठल…, करिता विचार सापडले वर्म…, वक्रतुंड महाकाय… यांसारखी गाजलेली गाणी त्यांच्या नावावर आहेत. कारेकरांना तानसेन सन्मान (2014), संगीत नाटक अकादमी (2016), लता मंगेशकर पुरस्कार, गोमांतक विभूषण पुरस्कार (2021) आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.

कलासक्त व्यक्तीमत्व हरपलं
मास्टर दीनानाथांच्या ढंगातील नाट्यपदेही ते विशेष तडफदारपणे सादर करत. प्रत्यक्ष रंगभूमीवर भूमिका न करताही, नाट्यसंगीताच्या क्षेत्रात अफाट लोकप्रियता मिळालेले गायक म्हणून कारेकर प्रसिद्ध आहेत. पल्लेदार ताना आणि गायनातील रंजकता यांमुळे कारेकर आपल्या गायनाने रसिकांना तृप्त करतात. आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार असून, दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमांत आणि आकाशवाणी संगीत संमेलनांत त्यांनी आपले गायन सादर केले. त्याचप्रमाणे त्यांना आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून गायन सादर करण्याची संधी मिळाली .अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, इटली, आखाती देश अशा अनेक देशांमध्ये त्यांनी आपले गायनाची भुरळ रसिकांना पाडली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"