फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

अटकेची भीती घालून ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी रुपये रकमेची फसवणूक!

अटकेची भीती घालून ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी रुपये रकमेची फसवणूक!

पिंपरी: एका व्यक्तीने सीबीआय मधून बोलत असल्याचे सांगून फिर्यादीच्या नावे कॅनरा बँकेमध्ये खाते असून त्या खात्याचा वापर मनी लॉन्ड्री साठी केला आहे. या कारवाईतून वाचण्यासाठी फिर्यादीच्या बँक खात्यावरील व म्युच्युअल फंडामधील रकमेची लिगेलिटी चेक करायचे असल्याचे सांगत व फिर्यादीला अटकेची भीती घालून ज्येष्ठ नागरिकाची एकूण एक कोटी रुपये रकमेची फसवणूक केली असल्याची फिर्याद सायबर गुन्हे शाखेकडे दाखल करण्यात आली आहे. ही घटना 30 डिसेंबर 2025 ते 14 जानेवारी 2026 या कालावधीत घडली आहे.

viara vcc
viara vcc

याबाबत अशोक क्रिष्णा सराफ (वय 77, प्लॉट नंबर 60, सेक्टर 18, पीसीएनडीटीए, शिवाजी पार्क चिंचवड) या जेष्ठ नागरिकाने फिर्याद दाखल केली आहे. डिपार्टमेंट सर्वेलन्स अधिकारी, सीबीआय ऑफिसर यांचे मोबाईल क्रमांकावरून व विविध चार बँकांच्या खातेधारका विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना आरोपी यांनी सीबीआय मधून बोलत असल्याचे सांगून फिर्यादीचे नावे कॅनरा बँकेमध्ये खाते असल्याचे सांगितले .सदरचे खाते नरेश गोयल यांचे वर केलेल्या ईडी कारवाई मध्ये मिळून आले . हे खाते मनी लॉन्ड्री साठी वापरले असल्याचे सांगितले.

तसेच फिर्यादीला सदर कारवाई मधून वाचवण्यासाठी बँक खात्यावरील व म्युच्युअल फंडामधील रकमेची लिगेलिटी चेक करायचे असल्याचे सांगून व फिर्यादीला अटकेची भीती घालून फिर्यादीची एकूण एक कोटी रुपये रक्कम जबरदस्तीने धमकावून वेगवेगळ्या बँक खात्यावर पाठविण्यास लावली. सदर रकमेची लिगेलिटी चेक केले नंतर फिर्यादीला सदरची रक्कम परत करण्याचा विश्वास देऊन फिर्यादीने पाठवलेली एकूण एक कोटी रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नाळे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"