बनावट कागदपत्राच्या आधारे जेष्ठाची फसवणूक!

पिंपरी : बनावट कागदपत्रांच्या आधारे नोटरी दस्त बनवून एका ज्येष्ठ व्यक्तीची व त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक केली आहे. रावेत येथे 28 मे 2021 ते 10 एप्रिल 2026 या दरम्यान हा प्रकार घडला आहे.

याबाबत गुलाब तुकाराम भोंडवे (वय 60, रा. भैरवनाथ मंदिर रावेत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संदीप भोंडवे (रा.रावेत )असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप भोंडवे यांनी फिर्यादी यांच्या नावे असलेली येथील 118 गुंठे मिळकतीची फिर्यादी यांच्याबरोबर बनावट विसार पावती केली. त्यावर त्यांच्या घरातील कुटुंबाची बनावट सही व अंगठ्याचे ठसे घेऊन दस्त नोंदवले. याद्वारे सुहास गोलांडे, दिलीप सोहनराज जैन व भावेश भागचंद्र सोनगीरा यांच्याशी नोटरी विसर पावती द्वारे करारनामा देखील केला. त्यांच्याकडून 75 लाख रुपये घेतले. दरम्यान मनिष जैन यांच्याबरोबर केलेले दस्त रद्द करण्यासाठी संदीप भोंडवे यांनी सांगितल्याप्रमाणे जैन यांनी फिर्यादीला 20 लाख रुपये परत केले. मात्र ती रक्कम संदीप भोंडवे यांनी स्वतःकडे ठेवून फसवणूक केली.

