फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
गुन्हेगारी

ज्येष्ठ नागरिकाची व्हाट्सअप नंबर वरून दोन लाखाची फसवणूक!

ज्येष्ठ नागरिकाची व्हाट्सअप नंबर वरून दोन लाखाची फसवणूक!

पिंपरी : डेथ क्लेमचे फॉर्म व जरुरी माहितीसाठी बँक ऑफ बडोदा गुजरात साठी गुगल वरून टोल फ्री नंबर वर कॉल केला असता व्हाट्सअप वर कस्टमर सपोर्टचा फॉर्म भरण्यास सांगितले . फिर्यादीने कस्टमर सपोर्ट अशी फाईल पाठवली त्यामध्ये त्यांनी उघडा वं फॉर्म भरा असे सांगितल्याने फाईल ओपन केली असता फिर्यादीस टेक्स्ट मेसेज असे आल्याने हा फसवणुकीचा कॉल आहे हे लक्षात आल्याने कॉल कट केला. मात्र फिर्यादीचे बँक ऑफ बरोडाचे क्रेडिट कार्ड नंबर वरून अनोळखी इसमाने एकूण एक लाख 99 हजार 500 काढून फसवणूक केली आहे .ही घटना एक एक डिसेंबर 2025 प्लॉट नंबर 501 प्लॅटिनम प्लाझा तुळजाभवानी मंदिर जवळ मस्के वस्ती रावेत येथे घडली .

viara vcc
viara vcc

याबाबत  रत्नाकर देवेंद्र नाशिककर (वय 64, प्लॉट नंबर 501, प्लॅटिनम प्लाझा, तुळजाभवानी मंदिर, मस्के वस्ती, रावेत, मुळगाव. घर नंबर 66, ए. स्वामी नारायणनगर, सनफार्मा कंपनी समोर , अटलादरा, बडोदरा, गुजरात) या ज्येष्ठ नागरिकाने रावेत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती, मोबाईल धारक नंबर व व्हाट्सअप धारक यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी बँक ऑफ बरोडा गुजरात येथील बँकेत डेथ क्लेम चे फॉर्म व इतर जरुरी माहितीसाठी गुगल वरून टोल फ्री नंबर वर कॉल केला मात्र संबंधित आरोपीने आपल्या दुसऱ्या मोबाईल क्रमांकावर हा फोन कॉल ट्रान्सफर केला, व त्यांनी फिर्यादीस व्हाट्सअप वर कस्टमर सपोर्ट चा फॉर्म भरण्यास सांगितले .आरोपीने त्यांच्या मोबाईल नंबर वर कस्टमर सपोर्ट अशी फाईल पाठवली त्यामध्ये त्यांनी ते उघडा व फॉर्म भरा असे सांगितल्याने ती फाईल ओपन केली असता फिर्यादीस टेक्स्ट मेसेज असे मेसेज आल्याने फिर्यादीस फसवणुकीबाबत शंका आली, त्यांनी कॉल कट केला असता फिर्यादीचे बँक ऑफ बरोडाचे क्रेडिट कार्ड नंबर वरून सुमारे दोन लाख रुपये काढून घेऊन फसवणूक केली आहे. याबाबत मोबाईल धारक व व्हाट्सअप धारक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फटांगरे हे पुढील तपास करत आहे

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"