सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजन 10 ते 14 डिसेंबर या कालावधीत!

मुकुंद नगर येथील महाराष्ट्र मंडळ क्रीडांगणावर
पुणे : शास्त्रीय संगीतातील मानाचे व्यासपीठ समजले जाणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे यंदाचे आयोजन 10 ते 14 डिसेंबर 2025 या कालावधीत मुकुंद नगर येथील महाराष्ट्र मंडळ क्रीडांगणावर आयोजित करण्यात आले आहे .आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित होणाऱ्या या 71 व्या महोत्सवातील या कलाकारांची यादी कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली .यंदाच्या महोत्सवात निम्म्याहून अधिक कलाकार प्रथमच या व्यासपीठावर सादरीकरण करणार आहेत.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गुरु सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ सुरू केलेला हा महोत्सव आज भारतीय शास्त्रीय संगीताचे सर्वोच्च वारसा केंद्र बनले आहे. दिग्गज कलाकारांसोबत नवोदित परंतु आश्वासक कलाकारांना संधी देणे हीच आमची परंपरा आहे .यंदाही आम्ही युवा पिढीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे असे श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.
10 डिसेंबर – दुपारी तीन वाजता महोत्सवाची सुरुवात दिल्लीचे शहनाई वादक लोकेश आनंद यांच्या वादनाने होईल. त्यानंतर डॉक्टर चेतना पाठक मिश्रा बंधू (रितेश-रजनीश),पं सुरेंद्र राव शास्किया-दे-हास ( सतार चलो जुगलबंदी )आणि जेष्ठ गायक पंडित उल्हास कशाळकर यांचे सादरीकरण होईल .
11 डिसेंबर – ऋषिकेश बडवे, इंद्रायुत मुजुमदार (सरोद ),विदुषी पद्मा देशपांडे आणि जॉर्ज ब्रुक्स, पंडित कृष्ण मोहन भट्ट (जॅझ- सत्तार जुगलबंदी )सादर करणार आहेत .
12 डिसेंबर – सत्येंद्र सोलंकी (संतूर ),श्रीनिवास जोशी, वस्ताद सुजात हुसेन खान सतार आणि डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांचे गायन रसिकांना ऐकायला मिळेल
13 डिसेंबर – हा दिवस विशेष ठरणार आहे. सिद्धार्थ बालमृत्यू, अनुराधा कुबेर, पंडित रूपक कुलकर्णी (बासरी), डॉक्टर भरत बलवल्ली विदुषी कला रामनाथ डॉक्टर जयंती कुमरेश (व्हायोलिन विचित्र विना जुगलबंदी ) आणि कथक नृत्यांगना मेघ रंजनी मेधी यांचे सादरीकरण होईल .
14 डिसेंबर – अंतिम दिवशी पंडित उपेंद्र भट्ट ,श्रुती विश्वकर्मा मराठे, अनिरुद्ध ऐताळ ,सावनी शेंडे- सोठीश्र्वर , डॉक्टर एल शंकर (व्हायोलिन )पद्मश्री पंडित वेंकटेश कुमार आणि किराणा घराण्याच्या कलाकारांचा विशेष अर्ध्य कार्यक्रम होणार आहे .
या महोत्सवात प्रथमच सादरीकरण करणाऱ्यां लोकेश आनंद ,डॉक्टर चेतना पाठक, सुभेंद्रराव सास्किया राव ,ऋषिकेश बडवे ,इंद्रायुथ मुजुमदार ,जॉर्ज ब्रुक्स ,सत्येंद्र सोलंकी ,सिद्धार्थ वेलमण्णू, अनुराधा कुबेर ,पंडित रूपक कुलकर्णी, डॉक्टर भरत बलवल्ली, मेघ रंजनी मेधी, श्रुती मराठे, अनिरुद्ध ऐताळ आणि डॉक्टर एल शंकर यांचा समावेश आहे. या पत्रकार परिषदेला शिल्पा जोशी सुभद्रा मूळगुंद, डॉक्टर प्रभाकर देशपांडे ,आनंद भाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

