फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट

सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट

मुंबई : राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतघेण्यत आला. या बैठकीत राज्यातील विविध विषयांसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच आगामी निवडणुक डोळ्यासमोर ठेवून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, आम्ही सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याच्या निर्णयासह लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे” अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ ,राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ ,उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान ,कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश असे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन कसे असणार?
राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार आता ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजार आहे, त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचं मानधन ३ हजारांवरुन ६ हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच उपसरंपचाचे मानधन देखील दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच २ हजार ते ८ हजारांच्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचाचं मानधन ४ हजारांवरून ८ हजार रुपये करण्यात आले, तर तेथील उपसरपंचांचं मानधन १५०० रुपयांवरून ३ हजार करण्यात आले. याबरोबरच ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ८ हजारांपेक्षा जास्त आहे, तेथील सरपंचाचं मानधन ५ हजारांवरून १० हजारांपर्यंत करण्यात आले आहे, तेथील उपसरपंचाचे मानधन २ हजारांवरून आता ४ हजारांपर्यंत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय झाले
लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय.
बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना : शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी .
कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश .
जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय.
शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग. १४८६ कोटीचा प्रकल्प .
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सूसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड .
राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दूप्पट वाढ .
एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार .
ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ .
राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ .
जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी .
श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मुळ मालकांना परत करणार .
उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"