सरहद डायमेन्शन २०२५ उत्साहात

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : सरहद कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, कात्रज, पुणे येथे कॉमर्स आणि बीबीए या विभागातर्फे बुधवारी सरहद डायमेन्शन २०२५ या राष्ट्रीय स्तरावरील आंतर महाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण प्रयोग व्हावेत त्या प्रत्येक घटकांमधून एक नवीन विश्व निर्माण व्हावे हा यामागचा उद्देश होता. या उपक्रमात बिजीएमआय, स्क्विड गेम, मॅड अॅड, ऑनलाइन फोटोग्राफी आणि सेमिनार असे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ. एम . जी. मुल्ला (आबेदा इनामदार महाविद्यालय, पुणे) यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाले. त्यांनी ‘यशाचा कानमंत्र आणि विद्यार्थी जीवन’ यावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. संगीता शिंदे, आय. क़यु . ए. सी . समन्वयक डॉ. स्वाती माने तसेच कॉमर्स विभाग प्रमुख डॉ. शीतल लकडे, बीबीए विभाग प्रमुख सहा. प्रा. श्रीराज भोर उपस्थित होते. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सुराग शहा (सुवर्णपदक विजेते – वाणिज्य पदव्युत्तर पदवी ), सी ए विश्वजित गायकवाड व नुपूर घोडके (विद्यापीठ स्तरावर नववा गुणवत्ता क्रमांक – बी बी ए) यांचा सन्मान करण्यात आला तसेच माजी विद्यार्थी निधी गिलबिले व ओम परदेशी हेही उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी सरहद महाविद्यालय व इतर महाविद्यालयातील एकूण ६९० विद्यार्थी व २४ इतर महाविद्यालय सहभागी झाले. विजेत्या स्पर्धकांना सरहद संस्थेचे विश्वस्त श्री. शैलेश वाडेकर, प्र. प्राचार्य डॉ. संगीता शिंदे तसेच कॉमर्स व बीबीए विभाग प्रमुखांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन कॉमर्स व बीबीए विभागाच्या सर्व प्राध्यापक व विद्यार्थी आयोजकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. श्रीराज भोर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहा. प्रा. अभिलाषा निरगुडे व डॉ. अश्विनी वठारकर यांनी केले.