फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
गुन्हेगारी

सेल्समनने परस्पर लॅपटॉप विकून केली फसवणूक !

सेल्समनने परस्पर लॅपटॉप विकून केली फसवणूक !

पिंपरी : लॅपटॉप शोरूम मध्ये सेल्समन असलेल्या व्यक्तीने शोरूम मधील आसुस कंपनीचा 67 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप परस्पर विक्री करून फसवणूक केल्याची घटना एक जुलै 25 ते 1 ऑगस्ट 25 या कालावधीत वर्ल्ड ऑफ लॅपटॉप शोरूम ,तपस्वी प्लाझा शॉप, काळभोरनगर, चिंचवड येथे घडली. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

प्रमोद शिवाजी भोजने (वय 45, ऐश्वर्या कंपार्ट गोल्ड सोसायटी, फ्लॅट नंबर 1804 , चिंचवड ) यांनी फिर्याद दाखल केली आहे. मुकुंद कैलास भालेराव (वय अंदाजे 26 ,रा. तळवडे, मुळगाव निअर नवनाथ मेडिकल ,मेन रोड गल्ली आडगाव, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे तपस्वी प्लाझा शॉप काळभोर नगर येथे असून या शोरूम मध्ये आरोपीस सेल्समन म्हणून कामावर ठेवले. फिर्यादीने विश्वासाने शोरूम मधील आसुस कंपनीचे लॅपटॉप विक्रीसाठी दिले असताना विक्री केलेला 67 हजार रुपये किमतीचा सिल्वर रंगाचा आसूस कंपनीचा लॅपटॉप परस्पर विक्री केला. त्याचे पैसे शोरूमच्या अकाउंट वर न घेता स्वतःकडे ठेवून फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणूक केली. सेल्समनने परस्पर लॅपटॉप विकून फसवणूक केली

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"