कासारसाई येथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार परदेशी महिलांची सुटका!

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक विभागाची कारवाई
पिंपरी : कासारसाई येथील सूर्य व्हिला येथे पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार परदेशी महिलांची सुटका केली आहे. यावेळी एका परदेशी महिला दलालास पोलिसांनी ताब्यात घेवुन तिच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आला. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक विभागाने ही कारवाई केली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना (दि.२४) गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक परदेशी महिला दलाल ही ग्राहकांना व्हाट्सअॅप कॉल करुन लोणावळा, परिसरात व्हिला बुक करण्यास सांगुन तेथे परदेशी महिलांना घेवुन येवुन त्यांच्याकडुन पैशाचे अमिष दाखवुन वेश्याव्यवसाय करुन घेत आहे.
त्यानुसार अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाईचे नियोजन करुन बनावट ग्राहकांना पाठवून हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कासारसाई येथील एक व्हिला बुक करुन घेतला. त्या ठिकाणी परदेशी एजंट महिला ०४ परदेशी पिडीत महिला घेवुन आली असता रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कासारसाई येथील सुर्य व्हिला येथे छापा टाकुन ०१ परदेशी महिला दलालास ताब्यात घेवुन तिच्या ताब्यातुन रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकुण २०,०२० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन ०४ परदेशी पिडीत महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे ऋषीकेश घाडगे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहा पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, पोलीस अंमलदार सुनिल शिरसाट, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, मुकुंद वारे, महिला पोलीस अंमलदार श्रध्दा भरगुडे, निलम बुचडे, संगिता जाधव यांनी केली आहे.