पीएमआरडीए मुख्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा!

पुणे : भारतीय प्रजासत्ताकाचा ७७ वा वर्धापन दिन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या आकुर्डी येथील मुख्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीताच्या ध्वनीत परिसर दुमदुमला. पोलिस दलाच्यावतीने राष्ट्रध्वजाला सन्मानपूर्वक सलामी देण्यात आली.

या कार्यक्रमास अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलिस अधीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी अमोल झेंडे, सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे, महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण, सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, सहआयुक्त (अनधिकृत बांधकाम निर्मूलन) दीप्ती सूर्यवंशी-पाटील, मुख्य अभियंता शिवकुमार बागडी, वित्तीय नियंत्रक सविता नलावडे, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी यांच्यासह पीएमआरडीएचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दक्षता विभागाचे पोलिस निरीक्षक महेशकुमार सरतापे यांच्या पथकाने ध्वजाला सलामी दिली. यावेळी अग्निशमन अधिकारी विजय महाजन तसेच पीएमआरडीए आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवान उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. योगेश म्हसे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संविधानाच्या मूल्यांचे जतन करणे तसेच जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडावीत, असे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

