फक्त मुद्द्याचं!

26th March 2026
गुन्हेगारी

पिंपरीतील व्यावसायिकावर गोळीबार करणारा रवींद्र घारे पुजारी गॅंगचा शूटर!

पिंपरीतील व्यावसायिकावर गोळीबार करणारा रवींद्र घारे पुजारी गॅंगचा शूटर!

एक पिस्तूल ,11 जिवंत काढतुसासह घेतले ताब्यात
पिंपरी : पिंपरी मार्केटमधील व्यवसायिकावर गोळीबार करणाऱ्या गँगस्टर रवींद्र घारे याला पिंपरी चिंचवडच्या मालमत्ता विरोधी पथकाने आज अटक केली आहे .रवींद्र घारे पुजारी  गॅंगशी संबंधित असून त्याच्यावर 25 पेक्षा अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. रवींद्र घारे हा सराईत गुन्हेगार आहे .त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून एक पिस्तूल, 11 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत . पिंपरीतील व्यावसायिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावताना प्रतिकार केल्याने घारे यांनी व्यावसायिकाच्या पायावर गोळी झाडली. यानंतर तो फरार झाला होता, त्याचा शोध पोलीस घेत होते .अखेर मालमत्ता विरोधी पथकाने त्याला जेरबंद केले.

viara vcc
viara vcc

सराईत गुन्हेगार रवींद्र घारे हा गँगस्टर रवी पुजारी ,सुरेश पुजारी यांच्याशी संबंधित आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे पिंपरीतील व्यावसायिकाला हेरून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. रवींद्र घारे याने चोरी करताना हेल्मेट आणि रेनकोट घातला असल्याने त्याच्या शोधासाठी अनेक अडचणी आल्या .अखेर मालमत्ता विरोधी पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन घारेला बेड्या ठोकल्या आहेत. घारे याच्यावर 25 पेक्षा अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत .हत्या, गोळीबार यासह इतर गुन्हे दाखल आहेत. घारे यांच्याकडून एक पिस्तूल, 11 जिवंत काडतुसे, दोन दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांनी सांगितली

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"