रवींद्र धंगेकर लढणारा कार्यकर्ता : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण
\आळंदी : भाजपच्या विरोधात आपली भूमिका नसल्याचे धंगेकर यांनी स्पष्ट केले आहे .जे प्रकरण सुरू आहे त्यावर लवकरच पडदा पडेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदी येथे व्यक्त केला .आळंदी येथील भक्त निवास आणि महाद्वार ते पुंडलिक मंदिर घाट सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते रविवारी झाले, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मंत्री भरत गोगावले शिवसेनेचे शिंदे गट पुणे महानगर प्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की पुणे महानगर प्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता आहे. अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता आहे .त्यांना महायुतीत दंगा करायचा नाही असे सांगितले आहे .पुण्याचे भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंगच्या जागेवरून धंगेकर यांच्याकडून विविध आरोप केले जात आहेत. महायुतीत एकत्र असलेल्या मोहोळ आणि धंगेकर दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री म्हणाले धंगेकर हा काम करणारा कार्यकर्ता आहे. अन्याया विरोधात लढणारा कार्यकर्ता आहे .महायुतीमध्ये वाद होऊ नयेत असे त्यांना सांगितले, तो विषय आता संपला आहे. धंगेकर यांना ज्या गोष्टींची माहिती मिळाली त्यावर ते बोलले आहेत.
विरोधकांच्या हातात कोणतेही कोलीत द्यायचे नाही असे धंगेकर यांना आपण सांगितले आहे असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले .आज आळंदी मध्ये भक्त निवासाचे भूमिपूजन झाले चांगल्या दर्जाचे भक्त घाट निवास होईल. वारकऱ्यांची मोठी सोय होईल इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यावर राज्य सरकार काम करत असून हा मुद्दा शासनाने गांभीर्याने घेतला आहे असे त्यांनी सांगितले .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक सादरीकरण झाली आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करणे हे आमचे प्रमुख काम आहे असे त्यांनी सांगितले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून या प्रकरणाची कठोर चौकशी करावी अशी मागणी केली आहे .या प्रकरणातील व्यवहार रद्द न झाल्यास सोमवार 27 ऑक्टोबर पासून बेमुदत धरणे आंदोलन आंदोलन करण्याचा इशारा धंगेकर यांनी दिला आहे.

