फक्त मुद्द्याचं!

3rd September 2025
शिक्षण

आयटी अभियांत्रिकीचा झपाट्याने विकास : कांचन भोंडे

आयटी अभियांत्रिकीचा झपाट्याने विकास : कांचन भोंडे

पिंपरी चिंचवड विद्यापीठात नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त ‘दीक्षारंभ’ समारंभ
पिंपरी : आयटी अभियांत्रिकीचा विकास झपाट्याने होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅट बॉट, चॅट जीपीटी हे शब्द परवलीचे झाले असून तीन चार वर्षांत तंत्रज्ञान बदलत आहे. याचा विचार करून आपली कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. तरच भविष्यातील आव्हानांचा यशस्वीपणे सामोरे जाऊन यश संपादन करता येईल, असे मार्गदर्शन सोगिती कॅपजेमिनीच्या वरिष्ठ संचालक कांचन भोंडे यांनी विद्यार्थ्यांना केले.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पीसीईटी संचालित पिंपरी चिंचवड विद्यापीठ, साते मावळ येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी ‘दीक्षारंभ’ समारंभाचे आयोजन सोमवारी (२५ ऑगस्ट) करण्यात आले होते. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, धनंजय काळभोर, प्रभारी कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे विभाग प्रमुख डॉ. रामदास बिरादार, अभियांत्रिकी विभाग अधिष्ठाता डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते.

भोंडे पुढे म्हणाल्या की, उच्च शिक्षण घेताना स्वयं शिक्षणावर भर दिला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वयं प्रेरणेने अभ्यास करत नाहीत; तोपर्यंत ज्ञानाच्या कक्षा रुंदावणार नाहीत; हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. पालकांनी देखील या बाबी विचारात घेतल्या पाहिजेत,

पीसीईटी शैक्षणिक समुहातील सर्व संस्था, पिंपरी चिंचवड विद्यापीठ विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे कार्य तीस – पस्तीस वर्षांपासून करत आहे. शिक्षक, प्राध्यापकांच्या योगदानामुळे संस्थेने ही प्रगती केली असून आंतरराष्ट्रीय पातळीवर पीसीईटीने दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. विद्यार्थ्यांनी काटेकोर शिस्तीचे पालन करत मन लावून अभ्यास करावा. अभ्यासक्रमा सोबतच मानसिक, शारीरिक तंदुरुस्तीवर भर दिला पाहिजे. यासाठी विद्यापीठात क्रीडा विभाग कार्यरत असून विद्यार्थ्यांनी येथील सुविधांचा लाभ घेतला पाहिजे. पालकांनी पाल्याच्या प्रगतीबाबत प्राध्यापकांशी नियमित संवाद साधला पाहिजे, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. सुदीप थेपडे, डॉ. रामदास बिरादार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रथम वर्ष अभियांत्रिकी मधील विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी पार्थ पेटकर, दिव्यांश गांगुर्डे, रिद्धीमा सिन्हा, स्वराली संते, हर्षदा गोंथे, मानव जोशी, काशवी श्रीवास्तव, वैष्णवी खंडेलवाल यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास विविध विद्या शाखेचे अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल विसपूते यांनी केले. आभार रितू दुधमल यांनी मानले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"