फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
गुन्हेगारी

ई-मेल आयडीवर डॉलरमध्ये मागितली खंडणी!

ई-मेल आयडीवर डॉलरमध्ये मागितली खंडणी!

पिंपरी: एका अनोळखी व्यक्तीने वडील आणि मुलाच्या ई-मेल आयडीवर वेळोवेळी खंडणीसाठी मेल पाठवून कुरिअरने बॉम्ब सदृश्य वस्तू पाठवून डॉलरमध्ये खंडणी मागितली. हा गंभीर प्रकार रावेत येथे समोर आला आहे. ही घटना 21 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत घडली. याप्रकरणी रमेश गणपतआप्पा रुमाले (वय 54 ,रावेत ) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला एका अनोळखी व्यक्तीने रुमाले यांना मेल करून दहा हजार डॉलरची मागणी केली .पैसे न दिल्यास 24 तासानंतर तीस हजार डॉलर द्यावी लागतील अशी धमकी दिली. त्यानंतर दुसऱ्या मेलमध्ये 30000 ची मागणी केली .आठ डिसेंबर रोजी रुमाले यांच्या घरी उबर ऑटो मार्फत पत्र आणि पार्सल पाठवण्यात आले .त्यामध्ये बॉम्ब सदृश्य संशयास्पद वस्तू होती. आणि पत्रात 20000 डॉलरची मागणी केली होती.

सुरुवातीला हा खोडसाळपणा केला असावा असे रुमाले यांना वाटले. परंतु 14 डिसेंबर रोजी पहाटे पुन्हा धमकीचा मेल आला .त्या मेलमध्ये 12000 डॉलरची मागणी केली आणि पूर्ण न केल्यास 24 तासानंतर वीस हजार डॉलर द्यावे लागतील अशी पुन्हा धमकी दिली .रावेत पोलीस पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"