राज्यभरात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे!

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतली असली तरी आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यभरात पुन्हा अवकाळी पावसाचे इशारा देण्यात आले आहेत .हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज मंगळवार 21 ऑक्टोबर पासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे देण्यात आले आहेत .

कोकण ,गोवा ,मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे .हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजपासून कोकण ,विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचे अलर्ट हवामान विभागाने देण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. गेल्या दोन महिन्यात मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पूर परिस्थिती होती .अनेक जनावरे दगावली ,घरे पाण्याखाली गेली ,मोठी पडझड झाली. झालेल्या नुकसानातून वर येत असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे नागरिक वैतागले आहेत .

