फक्त मुद्द्याचं!

28th March 2026
गुन्हेगारी

गुटखा विक्री करणाऱ्या पान शॉपवर छापा:एकास अटक

गुटखा विक्री करणाऱ्या पान शॉपवर छापा:एकास अटक

पिंपरी: सुगंधित तंबाखू, गुटखा, पान मसाला, व तत्सम पदार्थाचे विक्री करण्यास बंदी असताना लक्ष्मी पान शॉप वाल्हेकरवाडी चिंचवड येथे विक्रीसाठी 6941 रुपये किमतीचा प्रतिबंधक केलेला पान मसाला, सुगंधी तंबाखू व अन्य पदार्थाचा साठा विक्रीसाठी बाळगल्याने कारवाई करण्यात आली.

viara vcc
viara vcc

ही कारवाई शुक्रवार 27 मार्च रोजी करण्यात आली याप्रकरणी सायली सुरेश पटवर्धन अन्य सुरक्षा अधिकारी कार्यालय, पुणे- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, मोशी यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .राहुल कुमार अशोक मिश्रा ( वय 32, रा. दगडोबा चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने 16 जुलै 2025 रोजी एक वर्षासाठी सुगंधी तंबाखू, गुटखा, पान मसाला ,सुगंधित, स्वादिष्ट सुपारी व तत्सम पदार्थाचे उत्पादन, वितरण किंवा विक्री यावर बंदी घातली आहे .आरोपी यांनी त्यांच्या लक्ष्मी पान शॉप वर प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ विक्रीसाठी बाळगल्याचे आढळून आले. चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बळीप हे तपास करत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"