फक्त मुद्द्याचं!

20th April 2025
पुणे

पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाची लोणावळ्यात आत्महत्या!

पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाची लोणावळ्यात आत्महत्या!

पुणे : पुणे शहर पोलिस दलातील एका फौजदाराने लोणावळ्यात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अण्णा गुंजाळ असे आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात जाऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणावळ्यातील टायगर पॉईंटलगत त्यांनी झाडाला गळफास घेतल्यानं, पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी नेमकी आत्महत्या का केली याबाबतचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. गुंजाळ हे खडकी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते, मात्र तीन दिवसांपासून ते कर्तव्यावर नव्हते. तसेच त्यांचा संपर्कही होत नव्हता. दरम्यान, आज त्यांचा शोध लागला असता, त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

अण्णा गुंजाळ यांनी गळफास घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर त्यांची गाडी सुद्धा आढळलेली आहे, या गाडीत एक डायरी आहे. कदाचित या डायरीमध्ये त्यांच्या आत्महत्येमागचं कारण दडलेलं असू शकतं. लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहचलेले असून खडकी पोलीस ही घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पाँईटवर असलेली गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आता, या कारमधील डायरीत त्यांनी मृत्यूपूर्व काही लिहून ठेवले आहे का, याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे.

तीन दिवसापासून गुंजाळ गैरहजर होते. आज खडकी पोलीस त्यांची मिसिंग घेणार होते. त्यापूर्वी गुंजाळ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लोणावळा पोलीसांनी कळविले. खडकी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे गुंजाळ अधिकारी होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"