तिरळेपणावर मोफत शस्त्रक्रिया

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठान, पिंपरी व लायन्स क्लब ऑफ पुणे शताब्दी, डॉ. डी वाय पाटील आयुर्वेद रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीर ५ डिसेंबरला होणार आहे, अशी माहिती आयोजक दिपक कुदळे यांनी दिली.
या शिबिरात तपासणीसाठी शुक्रवार आणि शनिवारी टॅप्सनी हॊणार आहे. तर रविवारी शस्त्रक्रिया होणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय एम.आय.डी.सी, पवना इंडस्ट्रिज शेजारी, भोसरी पिंपरी या ठिकाणी होणार आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांवर तिरळेणावर संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया होईल. नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर, सचिव डॉ. राजेश पवार, डॉ. रमेश भागे,डॉ. ललित शहा, डॉ. सतिश देसाई , डॉ. वैभव बनारसे, डॉ. संपत पुंगलिया उपस्थित राहणार आहेत.