प्रा. दिगंबर ढोकले लिखित सूत्रसंचालनाचे अंतरंग पुस्तकाचे प्रकाशन!

जेष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते प्रकाशित
भोसरी : प्रा. दिगंबर ढोकले लिखित सूत्रसंचालनाचे अंतरंग वक्तृत्वासाठी विचारधन सूत्रसंचालनाचे अंतरंग या पुस्तकाचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ यांच्या शुभहस्ते प्रकाशित झाले. सूत्रसंचालकांसाठी तसेच भाषण करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक असून यात विविध विषयांवर उपयुक्त अशी अवतरणे आहेत.

मराठी, हिंदी, संस्कृत व इंग्लिश या चारही भाषांमध्ये माहिती उपलब्ध आहे. इच्छुकांना कोणत्याही प्रसंगी आवश्यक असणारी माहिती यात संकलित केली आहे. सूत्रसंचालकांसाठी ही शिदोरी आहे असे गौरवोद्गार डॉक्टर विठ्ठल वाघ यांनी काढले. वेदांताचार्य ह.भ.प. डॉक्टर नारायण महाराज जाधव यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे. या प्रकाशन प्रसंगी सुप्रसिद्ध कवी भरत दौंडकर, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे, ज्येष्ठ नगरसेवक वसंत नाना लोंढे, शंकर देवरे, मुकुंद आवटे, सुदाम भोरे,विलास मडीगेरी तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या वेळी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते प्रा. दिगंबर ढोकले व दिनकर मुंडे संचलित सुपर संभाषण क्लासेसचे ही उद्घाटन झाले.
मुरलीधर साठे यांनी प्रास्ताविक केले, प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. झोन चेअरमन मुकुंद आवटे यांनी आभार मानले