पुण्यात आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय!

पुणे : पुण्यातील स्वारगेट परिसरातील दोन आयुर्वेदिक मसाज सेंटर वर पोलिसांनी छापा-टाकत वेश्याव्यवसाय उघडकीस आणला आहे . या कारवाईत पाच महिलांची सुटका करण्यात आली असून दोन महिलांना अटक करण्यात आली आहे .

मार्केट यार्ड परिसरातील वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटर मध्ये देहविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती . या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत छापा टाकला. छाप्यादरम्यान चार महिला तिथे काम करत होत्या या सर्व महिलांची सुटका करण्यात आली, तर छत्रपती संभाजीनगर येथील एका महिलेला अटक करण्यात आली आहे,
दुसऱ्या कारवाईत मुकुंद नगर येथील दिया आयुर्वेदिक मसाज सेंटर मध्येही वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती . खात्री करण्यासाठी पोलिसांनी एक तोतया ग्राहक पाठवला. माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी छापा टाकून एका महिलेची सुटका केली . या प्रकरणात 38 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही मसाज सेंटरवर महिलांना पैशाचे आम्हीच दाखवून किंवा मजबुरीचा फायदा घेत त्यांच्याकडून देहविक्री करून घेतली जात होती . पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू ठेवला आहे .मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर वेश्याव्यवसाय करणाऱ्या सेंटरवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.

