फक्त मुद्द्याचं!

11th February 2026
गुन्हेगारी

साई पॅलेस हॉटेल, देहू फाटा येथे वेश्या व्यवसाय ; आठ जणांना अटक!

साई पॅलेस हॉटेल, देहू फाटा येथे वेश्या व्यवसाय ; आठ जणांना अटक!

पिंपरी : स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी साई पॅलेस हॉटेल देहू फाटा, आळंदी- चर्होली रोड, आळंदी देवाची येथे दिघी पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून वेश्या व्यवसाय करवून घेणार्या आठ जणांना अटक केली आहे. ही कारवाई मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

viara vcc
viara vcc

याबाबत महेश भारत लांडे (वय 28 पोलीस शिपाई)यांनी फिर्याद दिली पोलीस ठाणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. कृष्णा सुरेश पाटील (वय 35 ,रा. मंथन सोसायटी, फ्लॅट नंबर ए -३१०, डुडुळगाव, ता हवेली( मॅनेजर), राजमोहन शेट्टी (वय 52, दावडी रेजन्सी टावर इस्टेट, सी विंग फ्लॅट नंबर 205, डोंबिवली पूर्व, ठाणे, मुळगाव मंगलोर, उर्वा स्टोर लेडीज चर्च जवळ, कर्नाटक (मॅनेजर) ,संजय अमीन बाबरी (वय 25, रा. गाव तडे ग्राम, पोस्ट बहरा, तहसील पारा, जि. पुरेलिया, पश्चिम बंगाल), साबीर अख्तर अली (वय 31, रा. श्याम नगर, वासदेवपूर ,पोस्ट वासदेपूर, जि. कोलकत्ता, पश्चिम बंगाल), भरत दत्तात्रय बिराजदार (वय 27, रा. शिंदे गल्ली, ता. उमरगा, जि. धाराशिव), विक्रम हिरा वढ (वय 32, रा. महेंद्रनगर, भुजेला थाना, गड्डा चौकी, जि. महाकाली, काठमांडू, नेपाळ), हॉटेल चालक पद्मलोचन दास उर्फ कालुशेठ, हॉटेल मालक अवधूत गाढवे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी क्रमांक एक ते सहा यांना अटक केले आहे .

आळंदी देहू फाटा आळंदी- चर्होली रोड येथील साई पॅलेस हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय केला जातो अशी खबर पोलिसांना मिळाल्यानंतर दिघी पोलीस ठाण्याचे पोलिसांनी मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी रात्री दोन वाजता हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली. यामध्ये हॉटेल व्यवसायिकाने 17 पीडित महिलांना पैशाचे आमीष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता. तसेच आरोपी नंबर पाच व सहा हे पैशाच्या बदल्यामध्ये या हॉटेलमध्ये वेश्या गमन करताना 51 हजार 70 रुपये किंमतीचे मुद्देमालासह मिळून आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"