फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पुणे

“बिग व्हीआयपी प्रवास” उपक्रमाद्वारे पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला प्रोत्साहन!

“बिग व्हीआयपी प्रवास” उपक्रमाद्वारे पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला प्रोत्साहन!

पीएमपीएमएल. ९५ बिग एफएम आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल), ९५ बिग एफएम आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने, जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने ‘बिग व्हीआयपी प्रवास या विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम शनिवार, १४ जून रोजी स्वारगेट येथील पीएमपीएमएलच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात संपन्न आला.

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून आणि स्वच्छ, हरित भविष्यासाठी नागरिकांमध्ये सार्वजनिक वाहतुकीबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. या उपक्रमात शहरातील मान्यवर प्रशासकीय अधिकारी, प्रसिद्ध नागरिक, रोटरी क्लब पदाधिकारी, ९५ बिग एफएमचे आरजे तसेच इतर मान्यवरांनी सहभाग घेत स्वारगेट ते डेङ्कन असा प्रतिकात्मक बस प्रवास केला. खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडण्याचा संदेश त्यांनी दिला.

viarasmall
viarasmall

“बिग व्हीआयपी प्रवास” या उपक्रमास पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम (भाप्रसे). पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे (भाप्रसे), पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह (भाप्रसे), पीएमपीएमएल चे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशा राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच रोटरी क्लव ऑफ पिंपरीचे अध्यक्ष रोटेरियन संतोष गिरंजे, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट रोटेरियन संतोष मराठे, पर्यावरण संचालक रोटेरियन वसंतराव माळुंजकर, पर्यावरण मार्गदर्शक रोटेरियन राजेंद्रकुमार सराफ, प्रेसिडेंट इलेक्ट रोटेरियन आनंद संपत, क्लब सेक्रेटरी रोटेरियन सिद्धार्थ बोस, रोटेरियन स्मिता शितोळे आणि ९५ बिग एफएमच्या क्लस्टर प्रोग्रॅमिंग हेड श्रीमती गायत्री महादेवकर यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ९५ विग एफएमचे आरजे संग्राम यांनी केले. त्यांनी सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व प्रभावी शब्दांत मांडले, स्वारगेट ते डेक्कन बस प्रवासादरम्यान त्यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीमती दिपा मुधोळ मुंडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह मुलाखती घेत, पीएमपीएमएलच्या भविष्यातील योजना व सक्षमीकरणाबाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

“बिग व्हीआयपी प्रवास” या जनजागृतीपर उपक्रमात मान्यवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करत सकारात्मक संदेश दिला.
नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महानगरपालिका – पुण्यातील वाहतूक घनतेची परिस्थिती गंभीर असून, काही रस्त्यांवर प्रति किमी ३०० हून अधिक वाहने दिसतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक ही काळाची गरज ठरत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमपीएमएल एकत्रितपणे ही वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहेत. पीएमपीएमएलच्या ताफ्यात सीएनजी बस वाढविणे व स्मार्ट बसस्टॉप उभारणे हे प्राथमिक उद्दिष्ट राहील. परदेशात सार्वजनिक वाहतूक ही प्राथमिकता असते, भारतातही तीच संस्कृती रुजवणे गरजेचे आहे.

शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निगडी ते दापोडी बीआरटी मार्गिकवर दर तासाला सुमारे ५,६०० प्रवासी पीएमपीएमएल बसने प्रवास करतात. बीआरटी मार्गिका ही सार्वजनिक वाहतुकीसाठी जलद, सुरक्षित व प्रभावी साधन आहे. पिंपरी-चिंचवड शहरात बीजारटीचा विस्तार करण्यावर भर दिला जाणार आहे.

श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, सुधारित स्टेज रचना व तिकीट दर लागू केल्यानंतर पीएमपीएमएलचे दैनंदिन उत्पन्न २ कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. ‘आपली पीएमपीएमएल मोबाईल अॅपमुळे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंग व बसचे लाईव्ह ट्रैकिंग उपलब्ध झाले आहे, ज्यामुळे प्रवास अधिक सुलभ झाला आहे. पुणेकरांनी पर्यावरणपूरक आणि कोंडीमुक्त प्रवासासाठी पीएमपीएमएलला प्राधान्य द्यावे, असे आवाहन.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"