दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीमध्ये सातत्याने वाढ!

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीमध्ये सातत्याने वाढहोत असून पुणे महापालिकेने थकित मालमत्ताकर वसुलीची नोटीस रुग्णालयाला बजावली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे 22 कोटी रुपये थकीत मालमत्ताकर असून दोन दिवसात थकीत कर न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रकरणानंतर खाजगी रुग्णालयासंदर्भात पुणे महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. कोणत्याही रुग्णाला रुग्णालयात दाखल करताना कोणतीही अनामत रक्कम घेऊ नये अशी नोटीस सर्व खाजगी रुग्णालयांना बजावण्यात आली आहे. रुग्णांवर प्रथम उपचार करा आणि नंतर पैसे मागा अशा संदर्भातले आदेश प्रत्येक खाजगी रुग्णालयाला महापालिकेकडून देण्यात आले आहेत .महापालिकेकडून शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांना रुग्णांवरील तातडीच्या उपचारा संदर्भात नोटीस पाठवली आहे. तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेऊ नये .महापालिकेच्या या भूमिकेमुळे तातडीच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात मेडिकल निगलीजन्स आढळल्यास पुणे पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत याप्रकरणी ससूनच्या अधीक्षकांना पत्र लिहीत पोलिसांनी स्पष्टीकरण मागवले आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या प्रकरणानंतर पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयांबाबत महापालिकेने अजूनही कोणतीही दखल घेतलेली नाही. पिंपरी चिंचवड मध्ये देखील रुग्णांना दाखल केल्यानंतर तातडीने अनामत रक्कम भरण्यास सांगण्यात . या विरोधात अनेक संस्था आणि व्यक्तींनी वेळोवेळी आवाज उठविला आहे.