पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. पुण्यात स. प. महाविद्यालयात पंतप्रधान मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या ठिकाणी आदल्या दिवशी सगळी तयारी पूर्ण झाली होती. मात्र, हवामान विभागाने पुण्याला दोन दिवसांपूर्वीत रेड अलर्ट दिला होता. परतीच्या पावसाने गेल्या दोन – तीन दिवसांपासून चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे सर्वत्र रस्त्यांनाही नद्यांचे स्वरूप आले आहे. अशातच खबरदारी म्हणून पंतप्रदानांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील भूमिगत मेट्रोचे मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार होते. देशभरातील २२ हजार ६०० रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण तसेच पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार होती. परंतु पावसामुळे अडचणी येत असल्या कारणाने तसेच पंतप्रधान मोदींची ज्या ठिकाणी सभा होणार होती. त्याठिकाणी पावसामुळे चिखलाचं साम्राज्या पसरल्याने मोदींचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. तत्पूर्वी त्यामुळे एसपी कॉलेजच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. यामुळे तिथे कार्यकर्त्यांना बसण्यासाठी मोठी गैरसोय होण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रशासनाने तसेच पदाधिकाऱ्यांनी सभेचे ठिकाण बदलण्याचा उपाय सुचवला होता. त्या अनुषंगाने गुरुवारी दुपारी बारा वाजता जिल्हा प्रशासन, एसपीजी आणि प्रमुख संस्थांची बैठक देखील होणार होती. गणेश कला क्रीडा स्वारगेट येथे सभेचे ठिकाण निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. परंतु मोदींच्या दौऱ्यावर पावसाचे सावट असणार आहे, त्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. पुढील काही दिवसांसाठी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.