फक्त मुद्द्याचं!

5th February 2026
गुन्हेगारी

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 11 रेकॉर्डवरील आरोपींवर प्रतिबंधक कारवाई!

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 11 रेकॉर्डवरील आरोपींवर प्रतिबंधक कारवाई!

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रेकॉर्सडवरील सराईत गुन्हेगारांवर 14 दिवसांसाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ एकचे संदीप आटोळे यांनी दिली आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक 15 जानेवारी व मतमोजणी 16 जानेवारी रोजी असल्याने सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था आबादीत राहावी यासाठी रेकॉर्डवरील 11 आरोपींवर सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अमोल संजय भोसले, रोहित उर्फ सिनोंडा विजय जाधव ,बरकत उर्फ लल्या मोहम्मद जमादार, विजय उर्फ चांद राजू, भूषण उत्तम सुरवसे, चैतन्य नंदू कदम, रोहित दुर्गेश धर्माधिकारी ,विकी उर्फ कृष्णा आनंद संगमे, अभिषेक विष्णू कदम उर्फ मोन्या, आदित्य उर्फ पक्या बाळू कांबळे ,अक्षय संजय भोसले या आरोपींकडून निवडणूक काळात दखलपात्र गुन्हे घडण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

प्रतिबंधात्मक कारवाई 6 जानेवारी ते 19 जानेवारी अशी 14 दिवसाची असणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, सांगवी विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी व अमोल नांदेकर पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या नेतृत्वाखाली सांगवी पोलीस स्टेशन तपास पथकाने ही कारवाई केली आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 11 रेकॉर्डवरील आरोपींवर 14 दिवसांची प्रतिबंधक कारवाई

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"